`पीएम. नरेंद्र मोदी`च्या ट्रेलरमागोमाग मीम्स व्हायरल
या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला होता.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आतापर्यंतच्या आयुष्यावर आणि त्यांच्या एकंदर राजकिय कारकिर्दीवर आधारित असलेला 'पीएम. नरेंद्र मोदी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. ओमंग कुमार दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. अभिनेता विवेक ओबेरॉयची मुख्य भूमिका असणाऱ्या पीएम मोदींच्या बायोपिकचा ट्रेलर हा प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काहीच दिवसांमध्ये अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरला.
कोणी विवेकच्या अभिनयाची प्रशंसा करत या बायोपिकच्या ट्रेलरला दाद दिली, तर कोणी या ट्रेलरवर टीका केली. मोदींचा जीवनप्रवास उलगडणाऱ्या या चित्रपटातील मुख्य भूमिकेत असणारा विवेक ओबेरॉय काहींना खटकला. या सर्व वातावरणात एक गोष्ट मात्र प्रचंड व्हायरल झाली, ती म्हणजे चित्रपटाशी संबंधित मीम्स. 'माँ मै संन्यासी बनना चाहता हूँ....' पासून, 'मेरा गुजरात जल रहा है...' इथपर्यंतचे संवाद आणि ट्रेलरमधील काही दृश्यांचा आधार घेत सोशल मीडियावर अनेक मीम्सना उधाण आलं. मुख्य म्हणजे त्या मीम्ससोबत जोडण्यात आलेले संदर्भही तितकेच भन्नाटपणे मांडण्यात आले आहेत.
आयुष्यातील रोजच्या अडचणींपुढे हात टेकल्यानंकर एखादी व्यक्ती सहजपणे कशी व्यक्त होईल याविषयीचं हे मीम....
या बायोपिकला शोलेचा टचही देण्यात आला आहे....
पब जी या खेळाचं वाढतं प्रमाण आणि त्याचे परिणाम पाहता राजकोट पोलिसांना कोणी हा खेळ खेळताता दिसल्यास हीच त्यांची भूमिका असेल....
एप्रिल आणि मे महिन्यात तापमानाचा पारा चढला की अशी परिस्थिती होते....
परिक्षेनंतर विद्यार्थांच्या नोट्सचा अंदाज....