मुंबई : चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज हे त्यांच्या चौकटीबाहेरच्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. कायमच नव्या कथांना रुपेरी पडद्यावर साकारणाऱ्या या दिग्दर्शकाच्या एका सोशल मीडिया पोस्टनं नुकतंच सर्वांचं लक्ष वेधलं आहे. त्यांच्या या पोस्टमागचं कारण आणि त्याची कहाणी सर्वांच्याच काळजात कालवाकालव करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रीकरणादरम्यान एका शॉटची प्रतीक्षा करत असताना विशाल भारद्वाज यांच्यासमोर एक गजरे विकणारी महिला आली. जिला मदत करण्यासाठी म्हणून त्यांनी तिच्याकडचे सर्व गजरे घेतले. 


गजरे विकणाऱ्या महिलेची कहाणी त्यांनी एका लहानशा कॅप्शनमध्ये लिहित ही कहाणी एखाद्या चित्रपटाच्या योग्य आहे असंही त्यांनी म्हटलं. 


विशाल भारद्वाज यांची दिग्दर्शकाची नजर इथे डोकावून गेली, तर परिस्थिती एखद्या व्यक्तीला नेमकं काय-काय करायला भाग पाडते याचं उदाहरणही इथं पाहायला मिळालं. 


विशाल भारद्वाज यांना भेटलेली ही गजरे विकणारी महिला तिच्या कुटुंबातील कमवती एकमेव व्यक्ती. मुळची शाहीबाबादची असणारी ही महिला रात्री दिल्लीतील कनॉट प्लेस येथे गजरे विकण्यासाठी येते. 


या महिलेची मुलगी आणि मुलगा महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. इथं लक्ष देण्याजोगी बाब अशी की ही महिला दिल्लीतील एका मोठ्या रुग्णालयात सुरक्षा रक्षकाचं काम करते असंच तिच्या कुटुंबाला वाटतं. 


मुळात मात्र ती गजरे विकते हे मात्र कोणालाच ठाऊक नाही. मुलांना हे सत्य तिला कळू द्यायचं नाही. असं झाल्यास तिला हे काम न करु देता तिची मुलं शिक्षण सोडून देतील याचीच भीती तिला सतवते. 



अनेकदा खोटं बोलणं आणि खोटं बोलणारेही सुंदर असतात... अशा शब्दांत विशाल भारद्वाज यांनी हा प्रसंग सर्वांसमोर आणला. 


गजरे विकणाऱ्या या महिलेन आतापर्यंत कित्येतकांच्या जीवनात या फुलांनी एक अनमोल दरवळ आणला असेल. पण, तिच्या जीवनाला परिस्थितीची लागणारी धग मात्र फाक कमीजणांनाच ठाऊक असावी.