मुंबई : कोणत्याही नवजात बालकासाठी आईचं दूध हे अतिशय फायद्याचं आणि आरोग्याच लाभदायक असतं. पण, काही बालकांना मात्र यालाही मुकावं लागतं. अशाच काही बालकांसाठी बॉलिवूड चित्रपच निर्माती पुढे सरसावली आणि तिनं ब्रेस्ट मिल्क दान करण्याचा निर्णय घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निर्माती निधी परमार हिरानंदानी यंदाच्याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रसूत झाली. ज्यानंतर लॉकडाऊनच्या काळात तिनं ब्रेस्ट मिल्क दान करण्याचा निर्णय घेतला. 'बेटर इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत तिनं याबाबतची माहिती दिली. 'बाळाच्या जन्मानंतर आणि त्याच्या संगोपनादरम्यान माझ्या लक्षात आलं की माझ्या शरीरात बरंच दूध तयार होत आहे. मी इंटरनेटवर वाचलं होतं की ब्रेस्ट मिल्कला योग्य पद्धतीनं फ्रिजमध्ये ठेवल्यास ते तीन ते चार महिने खराब होत नाही', असं निधी म्हणाली. 


माहिती मिळवली आणि.... 


निधीनं याबाबत बरीच माहिती मिळवली. इंटरनेटवर तिला यापासून फेसपॅक तयार करतात अशीही माहिती मिळाली. काही मित्रांकडून निधीला माहिती मिळाली की, यापासून मुलांना अंघोळही घालतात किंवा याचा वापर त्यांच्या पायांना मसाज करण्यासाठी केला जातो. पण, हे असं करणं म्हणजे दुध वाया घालवणं असा निधीचा समज झाला. परिणामी कोणा गरजवंताला दूध देण्याचं ठरवत ती ब्रेस्ट मिल्क डोनेशनच्या पर्यायावर पोहोचली. 


निधीनं सांगितलं की तिनं मुंबईतील सूर्या हॉस्पिटलला जवळपास 40 लीटर ब्रेस्ट मिल्क दान केलं. याबाबत सांगताना ती म्हणाली, 'मी माझ्या गायनाकोलॉजिस्टशी संपर्क साधला. त्यांनी सांगितलं की, तुम्ही सूर्या हॉस्पिटलमध्ये दूध दान करन शकता. तेव्हापर्यंत माझ्या फ्रिजमध्ये 150 मिलीलीटर चे 20 पॅकेट्स साठले होते. पण, लॉकडाऊनच्या काळात हे ब्रेस्टमिल्क दान करणं मला एक समस्या वाटत होतं. पण, रुग्णालयानं मला कमालीचं सहकार्य केलं. त्यांनी सुरक्षित पद्धतीनं दूध नेण्याची व्यवस्था केली'. 



 


रुग्णालयात मिल्क बँक पुन्हा सुरु... 


मे महिन्यापासून निधीनं जवळपास 40 लीटर दूध दान केलं. याविषयी सांगताना निधी म्हणाली, 'पहिल्यांदा दूध दान केल्यानंतर मी ते साठवण्यास सुरुवात केली. दर 15-20 दिवसांनी मी दूध दान करते'. निधीनं दूध दान केल्यापासून हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा ब्लडबँक सुरु होण्यास मदत मिळाली. प्रसूती काळापूर्वीच जन्मलेल्या मुलांना यांचा बराच फायदा झाला.