मुंबई : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचं लग्न आता अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपलं आहे. सध्याच्या घडीला प्रत्येक सेलिब्रिटी या जोडीला शुभेच्छा देत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान याने दीप-वीरला शुभेच्छा दिल्या. ज्यामागोमाग आता या दोघांसोबतही काम केलेल्या एका लोकप्रिय दिग्दर्शकानेही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोण असेल बरं हा दिग्दर्शक? असाच प्रश्न पडला ना तुम्हालाही? किंवा मग उत्तराच्या शोधात असणाऱ्या तुमच्यापैकी बऱ्याचजणांच्या डोक्यात संजय लीला भन्साळी यांचं नाव आलं असेल. पण, तसं नाहीये. 


बी- टाऊनच्या या बहुचर्चित जोडीला यावेळी शुभेच्छा दिल्या आहेत दिग्दर्शक रोहित शेट्टी याने. 


'I am proud to showoff today that my Simmba is marrying my Meenamma!!! I Wish them all the luck for a blissfully beautiful future together', असं त्याने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. 


रोहितच्या दिग्दर्शनात साकारलेल्या 'चेन्नई एक्स्प्रेस' या चित्रपटाच दीपिकाने मीना (मीनम्मा) ही भूमिका साकारली होती. तर अता, रणवीर त्याच्या आगामी 'सिम्बा' या चित्रपटात 'संग्राम भालेराव' ही भूमिका साकारत आहे. त्यामुळेच रोहितने अनोख्या अंदाजात या दोघांनाही शुभेच्छा दिल्या. 


'सिम्बा'चं चित्रीकरण पूर्ण होण्याच्या निमित्ताने रणवीर सोबतचा फोटो पोस्ट करत रोहितने त्याच्या अभिनयाला दाद दिली. एक कलाकार म्हणून रणवीर किती समृद्ध आहे, याचीच प्रचिती त्याची ही पोस्ट वाचताना होत आहे. मुख्य म्हणजे चित्रीकरण सुरु झालं त्यावेळी रणवीर एक अभिनेता म्हणून आपल्यासमोर होता. पण, आता मात्र तो आपल्याला लहान भावाप्रमाणे असल्याचंही त्याने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.