मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या (Disha Patni) चाहत्यांची यादी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ती नेहमीच तिचे सौंदर्य चाहत्यांसमोर व्हीडिओ किंवा फोटोंमार्फत सादर करते. दिशाने आपल्या फोटोमुळे सोशल मीडियावर आग लावली आहे. दिशा कधीही बोल्ड फोटो शेअर करण्यात मागे हटत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडेच दिशाने पुन्हा एकदा सोशल मीडियावर आपल्या हॉट अंदाजाने आग लावली आहे. दिशाचे फॅन्स देखील तिच्या फोटोंची वाट पाहात असतात. म्हणूनच तिने फोटो शेअर करताच त्यावर लाईक्स आणि कमेंन्टसचा वर्षाव होतो.


दिशाने पुन्हा हॉट स्टाईलमध्ये


दिशा पाटनीने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोंमध्ये दिशाची अदा चाहत्यांना वेड लावणारी आहे, अभिनेत्रीने आता शेअर केलेल्या फोटोंमधील तिची खास स्टाईल पाहून चाहत्यांची नजरच हटत नाही आहे.


दिशाने शेअर केलेल्या फोटोत ती स्विमसूटमध्ये बोल्ड अंदाजात दिसत आहे. हा फोटो तसा जुना दिसत आहेत, परंतु त्या फोटो बद्दल दिशाने काही स्पष्ट केलेले नाही की, तो सध्याचा आहे की, जुना. फोटोंमध्ये ती बेडवरती बसलेली दिसत आहे.



अभिनेत्रीने शेअर केलेल्या सर्व फोटोंमध्ये ती एका वेगळ्या स्टाईलमध्ये पोज करताना दिसत आहे. एका फोटोमध्ये ती तिची पाठ दाखवत आहे. तर दुसऱ्यामध्ये समोरुन फोटो काढलेला आहे. दिशाचे चाहते त्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.