Ranbir Kapoor and Alia Bhatt Wedding : तिथं रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आयुष्यभराची साथ देण्यासाठी एकमेकांना वचनंदेत असतानाच इथं त्यांना लग्नाचे गिफ्ट म्हणून नेमकं काय- काय मिळणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. किंबहुना त्यांच्या नावे महागड्या आणि तितक्याच मौल्यवान भेटवस्तू येण्यास सुरुवातही झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारीच रणबीर आणि आलियासाठी सोन्याचा मुलामा असणारा एक पुष्पगुच्छ भेट स्वरुपात आला. या सुवर्णझळाळीनं त्याच्याकडे येणाऱ्या भेटवस्तूंची रिघ सुरुच झाली. 


काही वर्षांपूर्वी रणबीरच्या एका खास मैत्रिणीनं त्याला कंडोम भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता तेव्हा तर हे काही शक्य झालं नव्हतं. पण, आता लग्नाचं गिफ्ट म्हणून ज्याप्रमाणे खोडकर मित्र असे विचित्र गिफ्ट देतात त्याचप्रमाणे ही खास मैत्रीण रणबीरला कंडोम गिफ्ट देणार का हात प्रश्न चाहते विचारत आहेत. 


रणबीरची ही खास मैत्रीण आहे, दीपिका पदुकोण. निर्माता- दिग्दर्शक करण जोहरच्या कार्यक्रमात एकदा दीपिकानं अभिनेत्री सोनम कपूर हिच्यासोबत हजेरी लावली होती. त्यावेळी तिनं केलेल्या वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधलं. 


'मी रणबीरला कंडोमचं पॅकेट भेट देऊ इच्छिते कारण, तो याचा फार वापर करतो', असं ती तेव्हा म्हणाली होती. रणबीरला कोणता सल्ला देशील असं विचारलं असतानाही तिनं, या अभिनेत्यानं कंडोमच्या ब्रँडची जाहिरात करावी असं ती म्हणाली होती. (Ranbir deepika padunone)


दीपिकाच्या या वक्तव्यानं रणबीरच्या आई- वडिलांनी त्यावेळी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. पण, त्यानं मात्र यावर सौम्य प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं होतं. दीपिकानं फार चांगलं वक्तव्य केलं आहे, सुरक्षित शरीरसंबंधांविषयी लोकांना माहिती हवी आणि कंडोम हे त्याचंच एक माध्यम आहे, असं तो म्हणाला होता. (Deepika padukone)


बऱ्याच वर्षांपूर्वी दीपिकानं व्यक्त केलेली ही इच्छा पाहता आता रणबीर लग्नही करतोय, तर तीसुद्धा त्याला हे धमाल गिफ्ट देते हाच मोठा प्रश्न....