सलमानच्या कुटुंबातील `या` सुंदरीवर कशी नाही पडली कोणाची नजर, ऐश्वर्या, कतरिनाही तिच्यापुढे फिक्या
ती देतेय भल्याभल्या अभिनेत्रींना टक्कर
मुंबई : अभिनेता सलमान खान (salman khan) याच्या कुटुंबातील जवळपास प्रत्येक व्यक्ती कलाविश्वात योगदान देत आहे. परिणामी त्याच्या कुटुंबीयांची चर्चा होणं अगदी स्वाभाविक आहे. सध्या म्हणे सलमानच्या घरातील अत्यंत देखण्या व्यक्तीची जोरदार चर्चा सुरु आहे. ही व्यक्ती कोण, ती कशी दिसते असे प्रश्न तुम्हाला पडत असतील तर पुढे पाहा.
सलमानची बहीण अलविरा अग्निहोत्री हिची ही लेक. जिच्याबद्दल सध्या बरंच बोललं, लिहिलं जात आहे.
अलिजे असं तिचं नाव. अलिजे अग्निहोत्री (Alizeh Agnihotri)हिनं अद्यापही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नाही. पण, तरीही तिच्या नावाची चर्चा मात्र आतापासूनच सुरु झाली आहे.
हल्लीच म्हणे अलिजेनं इन्स्टाग्रामवर तिचं नवं फोटोशूट शेअर केलं आहे. ज्यामध्ये ती काळ्या रंगाट्या 'सिमरी' आऊटफिटमध्ये दिसत आहे.
अलिजेचा हा लूक तुफान व्हायरल होताना दिसतोय.
तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक नजर टाकल्यास भन्नाट फोटोंचा नजराणा पाहायला मिळतो.
अलिजेनं अजून तरी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नाही, किंबहुना तिचा असा कोणताही बेत असल्याचंही ऐकण्यात नाही. पण, तरीही ती ऐश्वर्या- कतरिनाला सहज टक्कर देईल असंच भाईजानच्या चाहत्यांचं मत.
जवळपास 71 हजारहून अधिकांनी तिला इन्स्टाग्रामवर फॉलो केलं आहे. तर तिच्या या फॉलोअर्स लिस्टमध्ये दिवगासणिक भरही पडत चालली आहे.
येत्या काळात गोष्टी अगदी सुरळीत राहिल्या तर, अलिजे बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मागील दोन वर्षांपासून ती अभिनय आणि नृत्याचं प्रशिक्षण घेत असल्याची माहिती समोर येत आहे.