मुंबई : आपल्या सुपरहिट चित्रपटांनी प्रेक्षकांना भुरळ घालणारा अभिनेता म्हणून संजय दत्त ओळखला जातो. संजय दत्त हा बॉलिवूडपेक्षा दाक्षिणेतील चित्रपटसृष्टीत अधिक काम करण्यास सज्ज झाला आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, संजयनं उघड केले की तो हिंदी चित्रपटांपेक्षा दाक्षिणेकडील चित्रपटांमध्ये जास्त दिसणार आहे. यश-स्टारर 'KGF: Chapter 2' मध्ये 'Adheera' ची भूमिका करून संजयनं प्रेक्षकांची मने जिंकली. आता संजय लवकरच  विजय थलापथी-स्टारर 'Thalapathy 67' आणि कन्नड चित्रपट 'KD the Devil' मध्ये दिसणार असल्याचे दिसणार आहे. याशिवाय संजयनं एका मुलाखतीत बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगविषयी एक वक्तव्य केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडे, 'केडी द डेव्हिल' चा हिंदी टीझर प्रदर्शित करण्यात आला त्या, कार्यक्रमात संजय म्हणाला की तो बहुतेक दाक्षिणेकडील चित्रपटांमध्ये दिसणार आहे. यासोबतच या संजयनं हिंदी चित्रपट निर्मात्यांना एक सल्लाही दिला होता.


संजय दत्त म्हणाला की प्रशांत नीलसोबत ‘KGF: Chapter 2’ मध्ये काम केल्यानंतर, तो त्याच्या आगामी चित्रपट ‘KD - The Devil’ साठी चित्रपट निर्माता प्रेमसोबत काम करण्यास तयार आहे. 'मला वाटतं की आता मी आणखी दाक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम करणार आहे.' 


पुढे संजय दत्त म्हणाला की, 'एसएस राजामौली आणि प्रशांत नील यांच्यासोबत काम केल्यानंतर त्यांनी पाहिले की दाक्षिणेतील चित्रपट खूप उत्कटतेनं, प्रेमानं आणि उर्जेनं बनत आहेत. बॉलिवूड हे विसरता कामा नये, असे त्याला वाटते.'


'केडी - द डेव्हिल' या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर अभिनेता ध्रुव सर्जा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची कथा 1970 च्या दशकातील आहे. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असून पुढील वर्षी कन्नड, तामिळ, मल्याळम, तेलगू आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचा दावा केला जात आहे.


संजय दत्तनं आपल्या संपूर्ण कारकिर्दीत हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत.  दरम्यान, संजय दत्तनंही अलीकडेच म्हटलं की, जर ‘खलनायक’चा रिमेक बनवला तर रणवीर सिंगला त्याला मुख्य भूमिकेत पाहायला आवडणार नाही. यामागील कारण म्हणजे रणवीरच्या वादग्रस्त न्यूड फोटोशूटमुळे तो कायदेशीर अडचणीत आला होता.