Suhana Khan Buys A Farm Land : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh khan) यानं कलाजगतावर अनेक दशकं राज्य केल्यानंतर आता त्याची पुढची पिढी या क्षेत्रामध्ये नाव कमवताना दिसत आहे. एकिकडे त्याचा मुलका Aryan Khan पटकथा लेखन, दिग्दर्शन या क्षेत्रांमध्ये कारकिर्दीची सुरुवात करत असतानाच दुसरीकडे त्याची मुलगी, सुहाना खान ही अभिनयासह मॉडेलिंग क्षेत्रातही नावारुपास येत असल्याचं पाहायला मिळत आहे. किंबहुना वयाच्या 23 व्या वर्षापासूनच ती काही महत्त्वाचे निर्णयही घेताना दिसत आहे. अर्थात यामध्ये ती स्वत:च्या वडिलांचं म्हणजेच शाहरुख खानचं अनुकरण करतानाही दिसतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिला चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच सुहानानं नजरा वळवल्या आहेत ते म्हणजे काही महत्त्वाचे आणि कोट्यवधींचे करार करून. मेबलिनच्या ब्रँड अँबेसिडर म्हणून करारबद्ध होण्यापासून ते अगदी आताआता तर अलिबागमध्ये (Alibag) जमीन खरेदी करण्यापर्यंतचे निर्णय तिनं घेतले आहेत. 


सुहाना झाली अलिबागकर... 


जाणून आश्चर्यचकित व्हाल, पण ज्या अलिबागमध्ये अनेकजण सहलीसाठी जातात तिथंच सुहानानं 1.5 एकरवर पसरलेली शेतजमीन खरेदी केली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये तिनं ही जमीन घेतली असून, त्यासाठी तिनं तब्बल 12.91 कोटी रुपये इतकी मोठी रक्कम मोजली आहे. 


हेसुद्धा वाचा : 'या' पावसाळी पर्यटन स्थळांवर बंदी; वीकेंडला Monsoon सहलीचा बेत फसला 


अधिकृत कागदपत्रांतून समोर आलेल्या माहितीनुसार तीन विविध बांधकामांमध्ये विभागलेली जमीन तिनं खरेदी केली आहे. जी अनुक्रमे 1750 चौरस फूट, 420 चौरस फूट, 48 चौरस फूट कार्पेट एरियामध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे. अंजली खोटे आणि इतर दोन कुटुंबासोबत तिनं हा व्यवहार केला असून अलिबगमधील थळ येथे तिनं ही जमीन खरेदी केली आहे. या जमिनीसाठी तिनं तब्बल 77.46 लाखांची स्टँप ड्युटी भरली आहे. तर, 1 जून 2023 रोजी या जमिनीच्या कागदपत्रांची नोंदणी करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. 


आगामी चित्रपटाच्या तयारीत जास्त रमतेय सुहाना 


येत्या काही दिवसांमध्ये सुहाना खान झोया अख्तर दिग्दर्शित The Archies या Netflix वर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटातून झळकणार आहे. या चित्रपटातून ती इतर काही स्टारकिड्ससोबत स्क्रीन शेअर करणार आहे. अभिनय क्षेत्रातील पदार्पणाच्या दृष्टीनं तिच्यासाठी हे अतिशय मोठं आणि महत्त्वाचं प्रोजेक्ट ठरत आहे. सध्या सुहाना याच चित्रपटाच्या निमित्तानं आयोजित केल्या जाणाऱ्या काही कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहे.