मुंबई : बॉलिवूडचा लोकप्रिय गायक अभिजीत भट्टाचार्य (Abhijeet Bhattacharya) यांचा मुलगा ध्रुव ( Dhruv) याला कोविड-१९ ची लागण झाली आहे. ध्रुव याला कोरोना विषाणूची सौम्य लक्षणे दिसत होती. त्यावेळी तो क्वारंटाईन झाला होता. दरम्यान, त्याची कोरोना चाचणी घेतली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, तो परदेश दौऱ्यावर जाणार होता. त्याचा आंतरराष्ट्रीय प्रवास आधीपासूनच नियोजित असल्याने त्याने कोरोनाबाबत चाचणी केली. त्यावेळी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. गायक अभिजीतने 'झी न्यूज'ला सांगितले की,  ध्रुव अ‍ॅसिम्प्टोमॅटिक (Asymptomatic) आहे. त्याला खूप सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. तो घरीच क्वारंटाईन आहे.


अभिजीतने सांगितले, मी माझ्या मुंबईतील संपूर्ण युनिटसह कोलकाता येथे आहे. माझ्यासोबत शान आहे. आम्ही एका आठवड्यापासून कोलकातामध्ये सर्व प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करीत असून शूटिंग करत आहोत. सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सगळ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. काळजी करु नये, सगळ्यांचे काळजीबाबत आभार. 


गायक अभिजीतचा मुलगा ध्रुव भट्टाचार्य हा मुंबईतस्थीत घरातच क्वारंटाईन आहे. तसेच अभिजीतचा कोरोना चाचणी निगेटिव्ह आलेली आहे.