B Praak Newborn Baby Died: बाळाचा जन्म होणार, ही भावनाच गरोदर माता आणि त्या बाळाच्या पित्याचं आयुष्य परिपूर्ण करत असते. बाळाची चाहूल लागल्यापासून ते जन्माला येईपर्यंतचा प्रवास बऱ्याच वळणांचा तरीही सुखद अनुभव देणारा. पण, एका बॉलिवूड सेलिब्रिटीच्या आयुष्यात आलेले हे सुखद अनुभव फार काळ टिकले नाहीत. कारण, नऊ महिने ज्या बाळाला या सेलिब्रिटीच्या पत्नीनं उदरात वाढवलं त्याच बाळानं जन्मताच जगाचा निरोप घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा बॉलिवूड सेलिब्रिटी म्हणजे बी प्राक. आपल्या आवाजानं प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या या गायकानं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली. पोस्टमधून तो म्हणाला, 'मनातल्या असह्य वेदनांसह मी सांगू इच्छितो की आमच्या नवजात बाळाचं जन्माच्याच वेळी निधन झालं. पालक म्हणून आमच्या आयुष्यातील आम्ही अनुभवत असलेला हा सर्वात वेदनादायी काळ आहे.' (Bollywood Singer B Praak Newborn Baby Died)


डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या सर्व प्रयत्नांसाठी त्यानं आभार मानले. बाळाच्या जाण्यानं आपल्याला जबर हादरा बसल्याचं सांगत या काळात काही क्षण कुटुंबाला एकांताची गरज असल्याची करुण विनंती त्यानं यावेळी केली. 


काही दिवसांपूर्वी बाळाच्या आगमनासाठी आतुर असणाऱ्या बी प्राक आणि त्याच्या पत्नीच्या आनंदासोबत होत्याचं नव्हतं झालं हे पाहून चाहतेही हळहळले. 



सेलिब्रिटी मित्रांनीही बी प्राकला या काळात आधार देत त्याला पत्नीची काळजी घेण्याचा सल्ला दिला. या परिस्थिती तू धीर सोडू नकोस, असाच काय तो संदेश सर्वजण देत राहिले.