मुंबई : सेलिब्रिटी मंडळींची मुंबईतील विविध ठिकाणी ये- जा सुरुच असते. एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लावणं असो किंवा मग मित्रमंडळांसमवेत काही खास क्षण व्यतीत करणं असो. ही सेलिब्रिटी मंडळी अनेक ठिकाणांवर भेट देतात. त्याचवेळी त्यांच्याभोवती होणारी चाहत्यांची गर्दीही सहाजिकच असते. कलाविश्वात गायन क्षेत्रात फार कमी कालावधीतच प्रसिद्धीझोतात आलेल्या नेहा कक्कर हिनेही अशाच प्रसंगाचा सामना केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका ठिकाणहून निघत असताना नेहासोबत एक सेल्फी काढण्यासाठी म्हणून तिच्या चाहत्यांनी गर्दी केलीय याच गर्दीत काहीतरी विकण्यासाठी म्हणून रस्त्यावरील मुलंही तिच्याकडे आली. नेहा दीदी- दीदी असं म्हणत त्या मुलांनी नेहापुढे काहीतरी पुटपुटण्यास सुरुवात केली. हे पाहताच नेहाने आपल्याजवळ असणाऱ्या पाकिटातून पैसे काढून ते त्या मुलांना दिले. एकाला पैसे दिल्यानंतर दुसऱ्यालाही नेहाने दोन हजाराची नोट दिल्याचं म्हटलं जात आहे. 


एक कलाकार ण्हणऊन या समाजात वावरत असताना नेहाच्या वाट्याला यश आणि लोकप्रियता आलीच. पण, त्यासोबतच तिच्यामध्ये असणारा खरेपणासुद्धा तितकाच मोठा होत गेला. अगदी इतरांना हेवा वाटेल इतका. यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी नेहालाही संघर्ष करावा लागला. त्यामुळे कायमच इतरांप्रती तिची आदरपूर्वक वागणूक सर्वांची मनं जिंकून जाते. 



सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओसुद्धा याचाच प्रत्यय देत आहे. अनेकांनीच हा व्हिडिओ लाईक केला असून, त्यावर काहींनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. यामध्ये नेहाच्या या कृतीची प्रशंसा करणाऱ्यांची संख्या जास्त होती. 


पाहा : देवाब्राह्मणाच्या नव्हे, संविधानाच्या साक्षीने अभिनेत्याने बांधली लग्नगाठ 


नेहा कक्कर ही गेल्या काही दिवसांपासून आदित्य नारायण याच्यासोबतच्या बहुचर्चित नात्यामुळेही चर्चेत होती. रिऍलिटी शोच्या मंचावर त्यांच्या लगीनघाईचे काही क्षणही पाहायला मिळाले. पण, अखेर हे सारंकाही कार्यक्रमाच्या लोकप्रियतेसाठी करण्यात आल्याचाच खुलासा करण्यात आला.