मुंबई : आयुष्यात येणार प्रत्येक नातं हे आनंदच देऊन जातं असं नाही. कित्येकदा हे नातं किंवा आयुष्यात येणारी माणसं ठराविक काळानंतर आपली साथ सोडतात आणि बरंच काही शिकवून जातात. पण, या दरम्यानचा काळ हा व्यक्तीला खचवून जातो. याच परिस्थितीचा सामना लोकप्रिय गायिका नेहा कक्कड हिला करावा लागला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता हिमांश कोहली याच्यासोबतच्या ब्रेकअपनंतर नेहाने तिच्या आयुष्याला बऱ्याच अंशी सावरलं होतं. सध्याच्या घडीला ती गाण्याच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने देशभरात विविध ठिकाणी दौरेही करताना दिसत आहे. पण, यादरम्यानच ती आणखी एका तणावाच्या परिस्थितीचा सामनाही करत आहे. 'इंडियन आयडॉल' या रिऍलिटी शोच्या दहाव्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या एका स्पर्धकासोबत तिचं नाव जोडलं जात होतं. 


नेहासोबत गाण्याच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने विविध दौऱ्यांवर सहभागी होणाऱ्या विभोर पराशर याला ती डेट करत असल्याच्याही चर्चांनी तिने जोर धरला होता. ज्यावर तिने आता काही महत्त्वाच्या गोष्टी उघड केल्या आहेत. इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून तिने काही गोष्टी सर्वांसमोर मांडल्या. ज्यामध्ये तिने आपण शारीरिक आणि मानसिक पातळीवर बऱ्याच अंशी खचल्याचं सांगितलं आहे.



 


नेहाने या पोस्टमध्ये काय लिहलं होतं? 


'या क्षणाला मी हे लिहित आहे. पण मी आता शारीरिकच नव्हे आणि मानसिकदृष्ट्याही खचले आहे. पण, आता मला हे लिहावंच लागत आहे. त्यांना याची जाणिवच नाही की, मीसुद्धा कोणाचीतरी बहीण, मुलगी आहे. कुटुंबीय आणि इतर सर्वांचाच मान वाढावा यासाठी मी आतापर्यंत कायमच प्रयत्नशील राहिले आहे', असं तिने लिहिलं. 


आपल्या खासगी आयुष्याविषयी सुरु असणाऱ्या सर्व अफवांवर तिने ठामपणे मतप्रदर्शन केलं. 'कोणत्याही गोष्टीचा विचार न करता ते अपवा पसरवूनच कशा शकतात? या साऱ्याचा अमुक एका व्यक्तीच्या खासगी आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. ती व्यक्ती सेलिब्रिटी असली तरीही ती सर्वप्रथम एक व्यक्तीच आहे. तुम्ही एखाद्या भावनाहीन व्यक्तीसारखं वागणं थांबवा', असं म्हणत तिने आपल्या खासगी आयुष्याविषयी अफवा परसवणाऱ्यांना एखाद्याच्या खासगी आयुष्याविषयी चर्चा करणं, त्यांच्या चारित्र्याविषयी बोलणं थांबवण्याची विनंती दिली. मुख्य म्हणजे या कृतीतून एखाद्यावा नैराश्यावस्थेत ढकलणं थांबवण्याची कळकळीची विनंती तिने या पोस्टमधून केली. 




'बुरा टाईम है' असं म्हणत ही कठिण वेळही निघून जाईल असं सांगत तिने एक सकारात्मक दृष्टीकोन सर्वांसमोर ठेवला. आपण ठीक असून देव आणि देवासारखंच कुटुंब आपल्या सोबतीने असल्याचंही ती म्हणाली.