दुबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं शनिवारी रात्री अचानक निधन झालं.


अचानक एक्झिट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीदेवी यांच्या अचानक जाण्याने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. श्रीदेवी यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांना देखील धक्का बसला आहे. कोणालाच विश्वास होत नाही आहे की, श्रीदेवी आज आपल्यात नाही आहे.


चार्टर विमानाने आणणार पार्थिव


श्रीदेवी यांचं पार्थिव आज दुबईहून सकाळी चार्टर विमानाने रवाना होणार असल्याची शक्यता आहे. दुबईमधील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीचं पार्थिव भारतात पाठवलं जाईल. मुंबईमध्ये अंत्यदर्शनासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.


का झाला विलंब?


रुग्णालयाच्या बाहेर मृत्यू झाल्यास कायद्यानुसार त्याची चौकशी होते. त्यानंतर पोस्टमॉर्टम होतं आणि मग रिपोर्ट येण्यासाठी 24 तासांचा वेळ जातो. त्यामुळे त्यांचं पार्थिव भारतात येण्य़ासाठी वेळ लागतो आहे.


बॉलिवूडकरांची गर्दी


मुंबईमध्ये श्रीदेवी यांच्या पार्थिवाची वाट बघितली जात आहे. बॉलिवूडचे अनेक कलाकार त्यांच्या निवासस्थान पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत श्रीदेवींवर अंत्यसंस्कार होणार आहेत.