हृतिक रोशनच्या मुलाचा क्यूट व्हिडिओ समोर; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
हृतिक रोशन आणि सुझैन खान अनेकदा त्यांची दोन मुले हृदान आणि रिहानसोबत वेळ घालवताना दिसतात.
मुंबई : बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझैन खान यांचा एकमेकांपासून घटस्फोट झाला असला तरी हे कपल नेहमीच आपल्या दोन्ही मुलांसाठी जबाबदार पालक आहेत. हृतिक रोशन आणि सुझैन खान अनेकदा त्यांची दोन मुले हृदान आणि रिहानसोबत वेळ घालवताना दिसतात. सुझैन खानने पुन्हा एकदा तिचा मुलगा ऋदानसोबत वेळ घालवला आहे. इतकंच नाही तर रिदानने आपल्या गायकीची टॅलेंटही दाखवलं आहे. हे पाहिल्यानंतर हृतिक रोशनचे चाहतेही त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
फोटोग्राफर वीरेंद्र चावलाने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर सुझैन खान आणि ऋदानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ मुलांच्या टॅलेंट हंटच्या कार्यक्रमातील आहे. ज्यामध्ये ऋदान आपल्या धमाल गाण्याने कार्यक्रमात उपस्थित लोकांची मने जिंकताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये सुजैन खान आणि ऋदान काळ्या ड्रेसमध्ये दिसत आहेत.
व्हिडिओच्या शेवटी ऋदान सर्वांसमोर गाणं गाताना दिसत आहे. वांद्रे येथे सुरू असलेल्या किड्स म्युझिकल कार्यक्रमात त्याने हे गाणं गायलं आहे. ऋदान हे गाणं गातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हृतिक रोशनच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूपच आवडला आहे. यासोबतच ते कमेंट करून ऋदानच्या गाण्याचं कौतुकही करत आहेत.
हृतिक रोशन आणि सुजैन खान यांचा 2014 मध्ये घटस्फोट झाला होता. तेव्हापासून दोघंही वेगळे राहतायेत. असं असूनही हृतिक रोशन आणि सुझैन खान आपल्या मुलांना पूर्ण वेळ देतात. दोघंही अनेकदा ऋदान आणि रिहानसोबत वेळ घालवताना दिसतात. दोघंही अनेकदा सोशल मीडियावर मुलांसोबतचे फोटो शेअर करत असतात.