बॉलिवूड सुपरस्टारची लेक गाजवणार हॉलीवूड!
स्टार कीड्स हे सुपरस्टार्सची मुलं असल्यानं ती जन्मल्या जन्मल्याच स्टार होऊन जातात.
Mithun Chakraborty Daughter Hollywood Debut: बॉलीवूडमध्ये अनेक कलाकारांचे आयुष्य बदलले आहे. कधी प्रसिद्धीमुळे तर कधी नशीबानं दिलेल्या साथीमुळे. अनेक कलाकारांना आयुष्याशी नवीन दिशा मिळाली आहे. त्यातून बॉलीवूडमध्ये जेव्हा स्टार कीड्सबद्दल (Bollywood Star Kids) बोललं जातं तेव्हाही अशाच काहीश्या प्रतिक्रिया उमटल्या जातात. (bollywood superstar mithun chakraborty adopted daughter going debut in hollywood movie)
स्टार कीड्स ही सुपरस्टार्सची मुलं असल्यानं ती जन्मल्या जन्मल्याच स्टार होऊन जातात. त्यांना अमाप प्रसिद्धी मिळते. तैमूर अली खानला (Taimur Ali Khan) तर त्याच्या जन्माच्या आधीपासूनच एक वेगळीच लोकप्रियता मिळाली होती. सोशल मीडियावर विशेष काहीच कर्तृत्व नसताना केवळ तो स्टार कीड्सचा मुलगा आहे म्हणून आणि त्याच्या क्यूटनेसमुळे त्याची सर्वत्र प्रसिद्धी झाली.
आणखी वाचा - करीना, विद्या बालनसोबत जुळलं नाव, पण अभिनेत्याने अरेंज मॅरेज करत सगळ्यांनाच दिला धक्का
परंतु बॉलीवूडमध्ये अशी एक स्टार कीड आहे जिच्या नशीबानंच तिला स्टार कीड बनवलं आणि ती आहे मिथून चक्रवर्तीची लेक दिशानी चक्रवर्ती (Mithun Chakraborty Daughter Dishani Chakraborty). दिशानी चक्रवर्ती आता लवकरच हॉलीवूड चित्रपटातून डेब्यू करणार आहे. मिथून चक्रवर्ती यांनी दिशानीला कचऱ्याच्या डब्यातून उचलून आणत तिचे प्राण वाचवले होते. दिशानीला त्यांनी दत्तक घेतले होते. आज दिशानीनं परदेशात जाऊन फिल्म मेकिंगचं प्रशिक्षण घेतलं आहे आणि आता ती हॉलीवूडच्या 'द गेस्ट' (The Guest) या शॉर्ट फिल्ममधून सिनेसृष्टीत पदार्पण करते आहे.
आणखी वाचा - आई नीतू कपूरनं Ranbir चा फोटो शेअर करतानाच नेटकरी म्हणाले...
2017 पासून दिशानी या क्षेत्रात कार्यरत आहे. 'स्मोक', 'अंडरपास' आणि 'स्बटेल एशियन डेटिंग विद पीबीएम' अशा काही शॉर्ट फिल्म्स तिनं बनवल्या आहेत. दिशानीनं आपलं शालेय शिक्षण तामिळनाडू येथील 'द मोनार्च इंटरनेशनल स्कूल' मधून केलं आहे. दिशानी सोशल मीडियावर पण एक्टिव आहे. ती दररोज आपले नवे रील्सही टाकत असते.
दिशानीनं नाटकांतूनही कामं केली आहेत. त्याचबरोबर अनेक जाहिरातींमधूनही तिनं कामं केली आहेत. याशिवाय एक्टिंग, इम्प्रूव, सीन स्टडी, ऑडिशन टेक्निक, पटकथा लेखन, आवाज आणि मूवमेंट अशी अनेक कौशल्यंही तिनं विकसित केली आहेत.