एक पोलिस इन्स्पेक्टर कसे बनले हिंदी सिनेमाचे Raaj Kumar
बॉलिवूड सुपरस्टार राज कुमार यांचा जन्म बलूचिस्तानमध्ये झाला
मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार राज कुमार यांचा जन्म बलूचिस्तानमध्ये झाला होता. त्यांचं खरं नाव कुलभूषण पंडित आहे. हे फार कमी लोकांना माहित आहे. शिक्षण पूर्ण केल्यावर राज कुमार यांनी मुंबईमध्ये इंस्पेक्टर म्हणून नोकरी करु लागले. एकदा चित्रपट निर्माते बलदेव दुबे काही कामानिमित्त पोलिस स्टेशनमध्ये गेले होते, तिथे राज कुमार यांच्या बोलण्याच्या स्टाईलमुळे ते इतके ईंम्प्रेस झाले की त्यांनी राज यांना त्यांच्या पुढच्या 'शाही बाजार' या चित्रपटासाठी ऑफर दिली.
राजकुमार यांनीही हिरो बनण्यासाठी नोकरी सोडली. त्यानंतर, 1952 मध्ये त्यांना 'रंगीली' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटा नंतर त्यांना जितक्या भूमिका मिळाल्या तितक्या भूमिका ते साकारत राहिले.
दरम्यान, राज कुमार यांनी 'कृष्णा सुदामा', 'घमंड' सारख्या बर्याच चित्रपटांत काम केलं, पण एकाही सिनेमांत यशस्वी झाले नाही. त्यानंतर 1957मध्ये आलेला 'मदर इंडिया' या सुपरहिट चित्रपटामुळे त्यांना फिल्म इंडस्ट्रीत ओळख मिळाली.त्यानंतर ते 1959 मध्ये दिलीप कुमार यांच्या सोबत पैगाम या चित्रपटात दिसले.
या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचं कौतुक प्रत्येकाने केलं. 1965 मध्ये बी.आर. चोप्रा यांच्या 'वक्त' चित्रपटाने राज कुमार यांचं आयुष्य बदललं. या चित्रपटाचे डायलॉग आजही लोकांना आठवतात. या चित्रपटानंतर राज कुमार यांनी आपल्या कारकिर्दीत कधीच मागे वळून पाहिलं नाही.
राज कुमार यांनी 'वक्त' चित्रपटानंतर 'तिरंगा', 'सौदागर', 'पाक़ीज़ा', 'हीर रांझा', 'नील कमल', 'दिल अपना और प्रीत पराई', 'हमराज़' असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. राज कुमार यांचं जेनिफर नावाच्या एंग्लो इंडियन मुलीशी लग्न झाल. एका ट्रिप दरम्यान राज कुमार जेनिफरला भेटले. लग्नानंतर जेनिफर यांनी आपलं नाव बदलून गायत्री ठेवलं.