मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार संजय दत्त आज 63 वा वाढदिवस साजरा करतोय. या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. तसेच वर्षभरात एक सिनेमा करणारा संजय दत्त हा कोट्यवधीचा मालक आहे. तसेच त्याची मुंबईत प्रॉपर्टी आहे.आलिशान कारचे कलेक्शन करण्याचाही त्याला शौक आहे. नेमका तो किती कोटीच्या संपत्तीचा मालक आहे ते जाणून घ्या.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1981 मध्ये आलेल्या 'रॉकी' या चित्रपटातून संजय दत्तने बॉलिवू़डमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटानंतर एकावर एक हिट चित्रपट देत तो यशाच्या उच्च शिखरावर पोहोचला. आता तो वर्षभरात फक्त एकच चित्रपट करतो तरीही तो कोट्यवधीच्या संपत्तीचा मालक आहे. संजय दत्तच्या मालमत्तेत देश-विदेशातील आलिशान घरांपासून महागड्या गाड्यांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे.


मुंबईत मालमत्ता
संजय दत्तकडे मुंबईत अनेक मालमत्ता आहेत. संजय दत्तचा पाली हिल्स येथे एक आलिशान बंगला आहे जो त्यांनी 2009 मध्ये खरेदी केला होता.सध्याच्या बाजारभावानुसार या घराची किंमत 40 कोटी आहे. 


इतकी संपत्ती आहे?
अभिनेता असण्यासोबतच संजय दत्त निर्माता देखील आहे आणि त्याची स्वतःची संजय दत्त प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. एका चित्रपटासाठी तो सहा ते आठ कोटी रुपये घेतो. याशिवाय ब्रँड्स एंडोर्समेंटच्या माध्यमातून करोडो रुपये कमावतात. संजय दत्तही दरवर्षी दीड ते दोन कोटी रुपये आयकर भरतो. त्याची एकूण संपत्ती 137 कोटींहून अधिक आहे.


लक्झरी कार कलेक्शन 
संजय दत्तला महागड्या आणि आलिशान वाहनांचा शौक आहे. त्याच्याकडे 10 हून अधिक वाहने आहेत. संजय दत्त हा भारतातील काही सेलिब्रिटींपैकी एक आहे ज्यांच्याकडे Ferrari 599 GTB आहे. Ferrari 599 GTB ची एक्स-शोरूम किंमत 1.5 कोटी ते 3.5 कोटी रुपये आहे. याशिवाय त्याच्याकडे रोल्स रॉयल घोस्ट, बेंटले, लँड क्रूझर, मर्सिडीज, पोर्शे हार्ले आणि डुकाटी सारखी वाहने आहेत. या वाहनांची किंमत कोट्यवधी रुपये आहे.