मुंबई : विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित  'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटानं प्रदर्शनानंतर लगेचच चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. काश्मीरच्या खोऱ्यात मूळ रहिवासी असणाऱ्या काश्मीरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराला या चित्रपटातून वाचा फोडण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कमाईच्या बाबतीतही चित्रपटानं बॉक्स ऑफिस गाजवलं. पण, एक प्रेक्षकवर्ग असाही होता ज्याला काही कारणास्तव हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहता आला नाही. पण, निराश होण्याचं कारण नाही.


अखेर प्रतीक्षा संपली आहे. कारण, आता घरच्या घरी बसूनच या चित्रपटाचा आनंद तुम्हाला घेता येणार आहे. 


खुद्द विवेक अग्निहोत्रीनंच सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी दिली. 13 मे रोजी  'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचं त्यानं सांगितलं. 



Zee5 वर हा चित्रपट आता तुम्हाआम्हा सर्वांना पाहता येणार आहे. कलाकारांचे दमदार अभिनय, ताकदीचं कथानक या साऱ्याची सांगड घालत हा चित्रपट प्रदर्शित झाला. 


राजकीय वर्तुळापासून ते अगदी देशातील सध्याच्या वातचावरणापर्यंत सर्वत्र या चित्रपटाचे पडसाद उमटताना दिसले. तुम्हाला आतापर्यंत या साऱ्याचं साक्षीदार होता आलं नसेल, तर अवघे काही दिवस थांबा.... कारण तुमच्या भेटीला थेट घरातच येतोय 'द काश्मीर फाईल्स'.