`RRR बॉलिवूड चित्रपट नाही, तर तो...`, S S Rajmouli यांच्या वक्तव्यानंतर Bollywood vs South वादाची ठिणगी
S S Rajmouli यांनी दिग्दर्शक गिल्ड ऑफ यूएस येथे `आरआरआर` च्या स्क्रीनिंग दरम्यान त्यानी हे वक्तव्य केलं होतं. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
SS Rajmouli Statement On RRR Movie : एसएस राजामौली (SS Rajmouli) यांचं दिग्दर्शन असलेला RRR हा ब्लॉकबस्टर चित्रपट आणि त्यातलं 'नाटू नाटू' (Naatu Naatu Song) हे गाणं जगभरात गाजलं आहे. याचं गाण्याने आता हॉलिवूडच्या सर्वोच्च पुरस्कारांपैकी असलेला हा गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावला आहे. एसएस राजामौली यांच्या 'RRR' चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी दोन श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे. दरम्यान, त्यानंतर एसएस राजामौली यांनी केलेले वक्तव्य समोर आले असून त्यामुळे खळबळ उडाली आहे. यावेळी आरआरआर हा बॉलिवूड चित्रपट नसून तेलुगू चित्रपट आहे.
आरआरआर या चित्रपटानं फक्त भारतात नाही तर परदेशातही बक्कळ कमाई केली. आरआरआर चित्रपटाला प्रदर्शित होऊन 10 महिने उलटले तरी देखील आजही प्रेक्षकांना पाहायला आवडतो. या चित्रपटा दरम्यान, दिग्दर्शक गिल्ड ऑफ यूएस येथे 'आरआरआर' च्या स्क्रीनिंग दरम्यान, एसएस राजामौली यांनी एक मोठे विधान केले. त्यामुळे आता बॉलिवूड विरोधाच दाक्षिणात्य चित्रपट असा वाद होऊ शकतो.
MovieReport.com नं शेअर केलेल्या या वर व्हिडिओत 'RRR हा बॉलीवूड चित्रपट नाही. हा एक तेलुगु चित्रपट आहे, जिथून मी आलो आहे, असे एसएस राजामौली म्हणाले. पण मी चित्रपाटाला पुढे घेऊन जाण्यासाठी गाणी वापरतो, ना की चित्रपट थांबवण्यासाठी गाण्याचा आणि डान्सचा वापर करत. जर तुम्ही चित्रपट पाहिल्यानंतर 3 तास कसे गेले हे कळलं नाही असं म्हणालात तर ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल.
हा गोल्डन ग्लोब पुरस्कारानंतर सर्वत्र चित्रपटाचे कौतुक
80व्या गोल्डन ग्लोब अवॉर्डस 2023 अमेरिकेत 10 जानेवारील रात्री 8 वाजता सुरू झाले. परंतु भारतीय प्रेक्षकांना आज (11 जानेवारी 2023) रोजी पाहता येणार आहे. दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा आर आर या चित्रपटाने जगभरात आपली जादू दाखवली आहे. सर्वत्र या चित्रपटाचे कौतुक केलं जात आहे.
हेही वाचा : Shahrukh Khan च्या 'पठाण' चा ट्रेलर बुर्ज खलिफावर?
'नाटू नाटू' गाणं हे वर्ष 2022 मध्ये हिट गाण ठरले आहे. याचे तेलुगू भाषेतील गाणे हे काला भैरवा आणि राहुल सिप्लीगुंजने यांनी मिळून लिहिले होते. ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक एमएम कीरावानी यांनी संगीतबद्ध केले आहे. कीरवाणी गोल्डन ग्लोब पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर उपस्थित होते.
आरआर या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्यासोबत टेलर स्विफ्टचं गाणं कॅरोलीना Guillermo del Toro’s Pinocchio चे गाणे 'ciao papa', 'टॉप गनः मैवरिक' चं गाणं 'होल्ड माय हॅण्ड', लेडी गागा, ब्लडपॉप और बेंजामिन राइसचं गाणं 'लिफ्ट मी अप' लाही गोल्डन ग्लोबच्या अवॉर्डसाठी नामांकन मिळालं होतं. मात्र या गाण्यांना मागे टाकत एसएस राजामौली यांच्या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याने हा पुरस्कार मिळवला आहे.