Shahrukh Khan च्या 'पठाण' चा ट्रेलर बुर्ज खलिफावर?

Shahrukh Khan च्या पठाणचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून दुबईतील बुर्ज खलिफाचे हे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल...

Cars | Updated: Jan 15, 2023, 11:27 AM IST
Shahrukh Khan च्या 'पठाण' चा ट्रेलर बुर्ज खलिफावर?  title=

Shah Rukh Khan's Pathaan Movies Trailer On Burj Khalifa : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या 'पठाण' (Pathaan) चित्रपटामुळे चर्चेत आहे. शाहरुख हा लोकप्रिय अभिनेता असून त्याचे लाखो चाहते आहेत. शाहरुखच्या चाहत्यांमध्ये सगळ्यात जास्त संख्या ही त्याच्या दुबईत आहे. शाहरुखनं दुबईतील त्याच्या चाहत्यांना मोठं सरप्राइज दिलं आहे. 'पठाण'चा ट्रेलर (Pathaan Trailer In Dubai) दुबईतील सगळ्यात उंच इमारत बुर्ज खलिफावर (Burj Khalifa) दाखवण्यात आला आहे. यावेळी शाहरुख तेथेच उपस्थित होता. यावेळी शाहरुखनं सगळ्या चाहत्यांसी संवाद साधला. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

ट्रेलर प्रदर्शित झाल्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यासोबत शाहरुखनं 'पठाण' गाण्यावर डान्स केल्याचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओत तो बुर्जखलिफावर प्रदर्शित होत असलेल्या पठाणच्या ट्रेलरकडे पाहत आहे. तर दुसऱ्याच क्षणी तो पाठी वळतो आणि चाहत्यांना हॅलो करतो. तर एका व्हिडीओत शाहरुख पठाण या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. शाहरुखचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Shahrukh Khan Viral Video)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : Alia Bhatt प्रेग्नंसीनंतरही इतकी सुंदर, राहाच्या जन्मानंतर Alia Bhatt अशी ठेवते त्वचेची काळजी!

दरम्यान, शाहरुखच्या पठाण या चित्रपटात दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात दीपिकानं एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. तर जॉननं एका खलनायकाची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी नेटकऱ्यांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. काही प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत असे सांगितले. तर काही प्रेक्षकांनी त्यांना ट्रेलर पसंदीस उतरला नाही असे सांगितले. 

शाहरुखचा पठाण हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटा आधी शाहरुख गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'ब्रम्हास्त्र' (Brahmastra) या चित्रपटात दिसला होता. मात्र, या चित्रपटात त्यानं पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. खरंतर शाहरुख मुख्य भूमिका असलेला त्याचा शेवटचा चित्रपट हा झिरो होता. त्या चित्रपटानंतर शाहरुख आता 4 वर्षानंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. आता पठाण या चित्रपटातून शाहरुख पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.