दोन न्यूज चॅनेल्सविरोधात बॉलिवूडची उच्च न्यायालयात धाव
अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी यांच्याविरोधात तक्रार दाखल
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडवर सर्वच स्तरातून टीका करण्यात आली. घराणेशाही, गटबाजी त्यानंतर बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरणामुळे सुशांतच्या चाहत्यांनी समस्त बॉलिवूडला धारेवर धरलं. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी बॉलिवूडची प्रतिमा मलिन करण्याचा देखील प्रयत्न केला. त्यामुळे बेजबाबदार बातम्या देणाऱ्या न्यूज चॅनेल्सविरोधात बॉलिवूडच्या ३८ प्रॉडक्शन हाऊसने दिल्ली उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. यामध्ये बॉलिवूडचे तीन खान म्हणजेच अभिनेता शाहरूख खान, सलमान खान आणि आमिर खान देखील सामिल आहे.
याप्रकरणी दिल्लीतील कोर्टात दोन न्यूज चॅनल्स आणि ४ अँकर्सविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामध्ये रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर, नविका कुमार यांचा समावेश आहे. गेल्या काही महिन्यांपासून बेजबाबदार बातम्या प्रसिद्ध करून यांनी बॉलिवूडची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला, असं या याचिकेत नमुद करण्यात आलं आहे.
सुशांत आत्महत्या प्रकरणी बातम्या प्रसारित करताना डर्ट, फिल्थ, स्कम, ड्रगीज यांसरख्या शब्दांचा उल्लेख केल्यामुळे बॉलिवूडकरांच्या भावना दुखावल्या गेल्याचं देखील याचिकेत म्हटलं आहे. त्यामुळे CINTAA आणि IFTPCयांसारख्या संस्थेसह ३८ प्रॉडक्शन हाऊनने आवाज उठवला आहे.
द फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया
द सिने अँड टिव्ही आर्टिस्ट असोसिएशन
इंडियन फिल्म अँड टीव्ही प्रोड्युसर्स कौन्सिल
स्क्रीन रायरटर्स असोसिएशन
आमिर खान प्रॉडक्शन्स
अॅड लॅब फिल्म्स
अजय देवगण फिल्म्स
आंदोलन फिल्म्स
अनिल कपूर फिल्म अँड कम्युनिकेशन नेटवर्क
अरबाझ खान प्रॉडक्शन्स
आशुतोष गोवारीकर प्रॉडक्शन्स
बीएसके नेटवर्क अँड एन्टरन्टेमेंट
केप ऑफ गुड फिल्म्स
क्लिन स्लेट फिल्म्स
धर्मा प्रॉडक्शन्स
एमि एंटरटेन्मेंट अँड मोशन पिक्चर्स
एक्सएल एंटरटेन्मेंट
फिल्मक्राफ्ट एन्टरटेन्मेंट
कबीर खान फिल्म्स
होप प्रॉडक्शन
लव्ह फिल्म्स
नाडियादवाला ग्रँडसन एन्टरटेन्मेंट
वन इंडिया स्टोरीज
रमेश सिप्पी एन्टरटेन्मेंट
राकेश ओमप्रकाश मेहरा पिक्चर्स
रेड चिलीज एन्टरटेन्मेंट
रिल लाइफ प्रॉडक्शन
रिलायन्स बिग एन्टरटेन्मेंट
रोहित शेट्टी पिक्चर्स
रॉय कपूर फिल्म्स
सलमान खान फिल्म्स
सोहेल खान प्रॉडक्शन्स
टायगर बेबी डिजिटल
विशाल भारतद्वाज पिक्चर्स
यशराज फिल्म्स
यांनी रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर, नविका कुमार यांच्या विराधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.