नवी दिल्ली : दिवाळी सणाच्या निमित्ताने अनेकांनी नव्या, आनंद देणाऱ्या गोष्टींना सुरूवात केली. बॉलीवुडच्या आगामी स्टारनेही पहिल्यांदाच आपला चेहरा जगाला दाखवलायं. हो...आम्ही सांगतोय बॉलीवुड स्टार शाहिद आणि मीरा राजपूत कपूरचा मुलगा जेनबद्दल...मीराने शुक्रवारी रात्री पहिल्यांदाच आपल्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलायं. जेनचे फोटो याआधी ही सोशल मीडियातून समोर आले होते. पण त्या फोटोंमध्ये त्याला कपड्यांमध्ये बांधलेलं असायचं. अधिकृतपणे असा फोटो शेअर करण्याची कपूर परिवाराची ही पहिलीच वेळ आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोला मीरा ने 'हेल्लो वर्ल्ड' अशी कॅप्शनही दिलीयं. आपल्या परिवाराव्यतिरिक्त जगाशी थेट ओळख होण्याची ही पहिली वेळ आहे. 


मीशा चर्चेत 



6 सप्टेंबरला शाहिद आणि मीराचा मुलगा जेनचा जन्म झाला. त्यांची मोठी मुलगी मीशा देखील सोशल मीडियात चांगलीच चर्चेत असते. मीशाचा कोणताही फोटो सोशल मीडियात खूप व्हायरल होतो.


परिवाराची दिवाळी 



याक्षणी मीराने आपल्या परिवारासोबत दिवाळी सेलिब्रेशनचे फोटोही शेअर केले आहेत. यामध्ये तिची सासू आणि बॉलीवुड अभिनेत्री नीलिमा अजीम आणि दीर ईशान खट्टर देखील दिसत आहेत. दिवाळी सणांचा आनंद या परिवाराने चांगलाच लुटल्याचे या फोटोंतून दिसतंय.


या फोटोंमध्ये मीशा मस्ती करताना दिसतेयं.  आता काही दिवसांनी लोकांना मीशा आणि जेन मस्ती करतानाचे फोटो दिसू लागतील.



प्रसिद्धीच्या बाबतीत जेन आपली बहिण मीशाला मागे टाकतो का हे पाहणं मजेशीर असेलं.