Boman Irani Birthday: बॉलिवूडमध्ये अनेक हरहुन्नरी कलाकार आहेत. आज ते खूप मोठे सुपरस्टार आहेत परंतु  इतक्या मोठ्या मंचावर पोहचण्यासाठी त्यांना अनेक कष्ट हे उपसावे लागले आहेत. ज्येष्ठ अभिनेते बोमन इराणी यांच्या अभिनयाचे सर्वच जण फॅन्स आहोत. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं आपण त्यांच्याबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत. बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये जवळपास त्यांनी सर्व तऱ्हेच्या भुमिका या केल्या आहेत. त्यांच्या हरएक भुमिकांचे कौतुकही झाले आहे. बोमन इराणी यांचा जन्म 2 डिसेंबर 1959 रोजी मुंबईत झाला. आज ते 64 वर्षांचे झाले आहेत. '3 इडियट्स', 'लेगे रहो मुन्नाभाई', 'पीके', 'डॉन', 'उंचाई', 'मुन्नाभाई एमबीबीएस' असे त्यांचे अनेक चित्रपट हे गाजले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्रॅंट रोडवर त्यांचे फरसाणाचे दुकान होते. लहानपणीच वडिलांचे निधन झाल्यानं त्यांचा सांभाळ त्यांच्या आईनं केला. त्यामुळे कॉलेज पुर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबासाठी नोकरी करायचे ठरवले. त्यांनी ताज हॉटेलमध्ये वेटरचेही काम केले आहे. त्यांचे जेव्हा लग्न झाले तेव्हा त्यांच्या पत्नीनंही त्यांना खूप मदत केली. त्यांना शाळेत बोबडं बोलण्यावरूनही चिडवण्यात आले होते. 


त्यांच्या आईचा अपघात झाला तेव्हा त्यांनी ही नोकरी सोडली. त्यानंतर त्यांनी फरसाण चालवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 14 वर्षे त्यांनी त्यांचे फरसाणचे दुकान चालवले.  एके दिवशी त्यांच्या मित्रानं त्यांना एका जाहिरातीसाठी ऑडिशन द्यायला सांगितली. त्यांची निवड झाली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी म्हणता म्हणता 180 हून अधिक जाहिराती केल्या. त्यांनी नाटकांमध्येही कामं केली आहेत. त्यांची जाहिरात विधू विनोद चोप्रा यांनी पाहिली. त्यानंतर त्यांना मुन्नाभाई एमबीबीएसमध्ये प्रोफेसर जे. अस्थाना यांच्या भुमिकेसाठी विचारण्यात आले. यासाठी त्यांना 2 लाख रूपये ऑफर करण्यात आले होते. त्याआधी अमरीश पुरी यांना या भुमिकेसाठी विचारण्यात आले होते. त्यांनी नकार दिल्यानं ही भुमिका बोमन यांच्या नशीबी आली. त्यानंतर त्यांनी एकाहून एक असे चित्रपट केले आहेत.


आता ते राजकुमार हिरानी यांच्या 'डंकी' या चित्रपटातून दिसणार आहेत. आज बोमन इराणी हे बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यामुळे त्यांची जोरात चर्चाही रंगताना दिसते. सोशल मीडियावरही त्यांचे अनेक फॅन्स आहेत. त्यांच्यावर मीम्सही फिरतात. त्यामुळे सोशल मीडियावरही ते ट्रेडिंग असतात. त्याच्या 3 इडियट्समधल्या पात्रावरील अनेक मीम्सही व्हायरल होतात. त्यांचा मुलगाही कलाक्षेत्राशी निगडित आहे. कायोझ इराणी आलिया भट्टच्या 'स्टुडंट ऑफ द इयर'मध्ये दिसला होता.