Ambani wedding Bomb Threat Mumbai Police : देशातील सगळ्यात श्रीमंत आणि रिलायंस इंडस्ट्रीचे चेअरमॅन मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नात बॉम्ब असल्याचे म्हटले गेले होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याविषयी माहिती मिळाली होती. मुंबई पोलिस हे आता अंबानींच्या लग्नात बॉम्ब असल्याची पोस्ट शेअर करणाऱ्या त्या व्यक्तीचा शोध करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं खुलासा केला की पोलिसांनी रविवारी रात्री या पोस्टविषयी माहिती मिळाली होती. ती पोस्ट @FFSFIR नावाच्या X अकाऊंटवरून शेअर करण्यात आली होती. त्यात त्या व्यक्तीनं म्हटलं की 'एक विचार माझ्या मनात घर करून आहे की जर अंबानींच्या लग्नात बॉम्बस्फोट झाला तर अर्थ्या जगात लगेच उलथा-पालथ होईल. फक्त एका ट्रिगरने कोट्यवधी डॉलर्सचं नुकसान होईल.' पोलिसांनी ही फक्त फसवणूक असल्याचं जरी वाटलं असलं तरी त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं नाही, त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायचा नव्हता आणि जियो वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरच्या जवळपास सुरक्षा वाढवली. 



दरम्यान, अजूनही पोलिस या प्रकरणात तपास करत आहेत. त्या नेटकऱ्यानं 13 जुलै रोजी ही पोस्ट शेअर केली होती. त्यांना या पोस्ट मागचं सत्य जाणून घ्यायचं आहे. त्यांनी अजून कोणत्याही प्रकारची तक्रार या प्रकरणात दाखल केलेली नाही. ही पोस्ट करण्या मागचा त्या व्यक्तीचा काय हेतू आहे हे त्यांना जाणून घ्यायचं आहे. या सगळ्यात मुंबई पोलिसांनी मुंबईच्या जियो वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरच्या आवारातून दोन लोकांना अटक केली आहे. त्या दोघांनाही लग्नाचं आमंत्रण नव्हतं तरी ते तिथे जाण्याचा प्रयत्न करत होते. 


हेही वाचा : VIDEO : 'काही चुकलं असेल तर माफ करा...', नीता अंबानी यांनी हात जोडून कोणाची माफी मागितली?


दरम्यान, अनंत आणि राधिकानं 12 जुलै रोजी सप्तपदी घेतल्या. त्यांच्या लग्नात भारत आणि परदेशातून अनेक पाहुण्यांनी हजेरी लावली होती. त्यात फक्त चित्रपटसृष्टीतील कलाकार नाही तर अनेक राजकारणी आणि उद्योगपती देखील होते. त्यामुळे त्यांच्या लग्नात पोलिसांचा खूप मोठा बंदोबस्त होता. त्यांच्या सुरक्षेसाठी बीकेसीमधील अनेक रस्ते सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आले होते. त्यात जर कोणी असं ट्वीट केलं असेल तर नक्कीच पोलीस या सगळ्याला मस्करीत घेऊ शकत नव्हते.