VIDEO : 'काही चुकलं असेल तर माफ करा...', नीता अंबानी यांनी हात जोडून कोणाची माफी मागितली?

Nita Ambani With Folded Hand Saying Maaf Kar Dena : नीता अंबानी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jul 15, 2024, 11:15 AM IST
VIDEO : 'काही चुकलं असेल तर माफ करा...', नीता अंबानी यांनी हात जोडून कोणाची माफी मागितली? title=
(Photo Credit : Social Media)

Nita Ambani Folded Hand Saying Maaf Kar Dena : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटसाठी अंबानी कुटुंबानं शाही विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. 12 जुलै पासून सुरु झालेला हा लग्न सोहळा पार पडल्यानंतर आता सगळीकडे याच लग्न सोहळ्याची चर्चा सुरु आहे. खरंतर आता या लग्नाची चर्चा सुरु झाली नाही तर गेल्या सहा महिन्यांपासून या लग्नाची चर्चा सुरु होती. या लग्न सोहळ्यात फक्त भारतातून नाही तर परदेशातून देखील पाहुण्यांनी हजेरी लावली होती. आता लग्न आणि रिसेप्शन पार्टी संपल्यानंतर नीता अंबानी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्या हात जोडून माफी मागताना दिसत आहेत. 

नीता अंबानी या मुलगा अनंतच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होत्या आणि या सगळ्यातून थोडा थोडा वेळ काढत त्या पापाराझींची भेट घेत होत्या. इतकंच नाही तर त्या त्यांची विचारपुस करताना देखील दिसल्या. आता त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. यात त्यांनी पापाराझींचे आभार मानत त्यांची माफी मागताना दिसल्या आहेत. विरल भयानीनं त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत नीता अंबानी बोलताना दिसत आहेत की 'नमस्ते, तुम्ही सगळे इतक्या दिवसांपासून माझ्या अनंत आणि राधिकाच्या लग्नात आला आहात, त्यामुळे तुमच्यासगळ्यांचे आभार. हे लग्नाचं घर आहे आणि तुम्ही सगळे या सेलिब्रेशनचा भाग झालात. आभारी आहोत आणि तुम्ही दाखवलेल्या धीर आणि समजुतदारपणासाठी तुमचे आभार आणि हे लग्न घर आहे, त्यामुळे काही चूक झाली असेल तर माफ करा. मला आशा आहे की तुमच्या सगळ्यांची काळजी घेण्यात आली. आशा आहे की तुम्हाला सगळ्यांना उद्यासाठी आमंत्रण मिळालं आहे, तर उद्या तुम्हाला आमचे पाहुणे म्हणून यायचं आहे. आता आम्ही तुमचं स्वागत करणार. आम्ही तुमची काळजी घेऊ. उद्या तुमच्या कुटुंबासोबत आम्ही तुमचं स्वागत करू. खूप खूप धन्यवाद, पुन्हा एकदा आभारी मानते.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हेही वाचा : अनंत- राधिकाला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचली सेलिब्रिटींची देखणी योगा टीचर; कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी सुंदर नाही 'ती'

नीता अंबानी यांच्या या व्हिडीओनंतर सगळ्यांना त्यांचं फार कौतुक वाटतंय. एक नेटकरी म्हणाला, 'फक्त लग्न भव्य होण्यासाठी नाही तर सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची किती काळजी घेतली जाते. त्यांचे हे शब्द कोणालाही भावूक करतील. त्यांच्या बोलण्यात जी विनम्रता आहे ती शिकण्यासारखी आहे.' 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x