जान्हवी-ईशानच्या नात्याविषयी बोनी कपूर यांचा खुलासा
`धडक`नंतर जान्हवी आणि ईशान या जोडीच्या नात्याबाबत चर्चा सुरु होऊ लागल्या.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने गेल्या वर्षी दिग्दर्शक शशांक खैतान यांच्या 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात जान्हवी कपूरसोबत शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरने स्क्रिन शेअर केली होती. 'धडक'नंतर जान्हवी आणि ईशान या जोडीच्या नात्याविषयी चर्चा सुरु होऊ लागल्या.
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माते बोनी कपूर यांची मुलगी जान्हवीला नेहमीच तिच्या नात्याबाबत, ईशानबाबत प्रश्न विचारले जात होते. पण नुकतंच बोनी कपूर यांनाही जान्हवी आणि ईशानबाबत प्रश्न विचारण्यात आला.
एका वेबसाइटने दिलेल्या वृत्तनुसार, बोनी कपूर यांना जान्हवी आणि ईशान यांच्या नात्याविषयी प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी बोनी कपूर यांनी अतिशय सरळ शब्दांत उत्तर दिलं. 'ईशान आणि जान्हवी यांनी एकत्र चित्रपट केला आहे आणि ते आता चांगले मित्र झाले आहेत. मी माझी मुलगी आणि ईशानसोबत असलेली तिची मैत्री यांचा आदर करतो' अशा शब्दांत त्यांनी जान्हवी आणि ईशा यांच्या नात्याबाबत खुलासा केला.
एका कार्यक्रमात जान्हवीला बोनी कपूर ईशानबद्दल काय विचार करतात? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी जान्हवीने 'ईशान अतिशय चांगला अभिनेता आहे. तो हुशार असून तो एक चांगला मुलगा आहे' असं बोनी कपूर यांना वाटत असल्याचं जान्हवीने म्हटलं होतं.
जान्हवी सध्या तिच्या आगामी 'रुही आफ्जा' या हॉरर, कॉमेडी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती राजकुमार रावसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. याशिवाय जान्हवी 'दोस्ताना २' चित्रपटातून कार्तिक आर्यनसोबत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.