सलग दुसऱ्या दिवशी `सुपर ३०` चित्रपटाची दमदार कमाई
कोणत्याही असंभव गोष्टीला संभव करण्याची इच्छा इत्यादी गोष्टींच्या भोवती `सुपर ३०` चित्रपटाची कथा फिरत आहे.
मुंबई : 'जब समय आयेगा, तब सबसे बडी छलांग हम ही मारेंगा...' असं म्हणतं चित्रपटगृहात दाखल झालेल्या 'सुपर ३०' चित्रपटाने खरचं बॉक्स ऑफिस चांगलीच छलांग मारली आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने ३० कोटींचा गल्ला जमा केला आहे. आयआयटी जेईई या स्पर्धा परीक्षांसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदत करत त्यांच्या भविष्याच्या वाटा प्रकाशमान करण्यासाठी हातभार लावणाऱ्या आनंद कुमार यांच्या कर्तृत्वाला 'सुपर ३०' या चित्रपटातून वाचा फोडण्यात आली आहे.
ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईचे आकडे ट्विटरवर शेअर केले आहेत. लहान मुलांना सशक्त बनवण्याचा प्रयत्न, लहान डोळ्यांना मोठे स्वप्न पाहाण्यासाठी असलेले अधिकार, कोणत्याही असंभव गोष्टीला संभव करण्याची इच्छा इत्यादी गोष्टींच्या भोवती 'सुपर ३०' चित्रपटाची कथा फिरत आहे.
अभिनेता हृतिक रोशन चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. अभिनेत्री मृणाल ठाकूर देखील चित्रपटात महत्वाची भूमिका बजावत आहे.