`वॉर`च्या तुलनेत प्रियांकाचं `आभाळं` फिकं
`द स्काय इज पिंक` चित्रपट बॉक्स ऑफीसवर अयशस्वी ठरल्याचा दिसत आहे.
मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्राचा 'द स्काय इज पिंक' चित्रपट बॉक्स ऑफीसवर अयशस्वी ठरल्याचा दिसत आहे. तर दुसरीकडे चित्रपट सलग चढत्या क्रमावर आहे. 'द स्काय इज पिंक' चित्रपटाची कथा आयशा चौधरी नावाच्या एका मुलीच्या आयुष्यावर आधारलेली आहे. 'द स्काय इज पिंक' हा चित्रपट मोटीवेशनल स्पीकर आएशा चौधरीवर आधारित आहे. आएशा पल्मनरी फायबरोसिस (Pulmonary Fibrosis) या आजाराने ग्रासलेली होती. प्रियंका आणि फरहान आएशाच्या पालकांची भूमिका साकारत आहेत.
चित्रपट इमोशनल असला तरी चाहत्यांच्या पसंतीस पडलेले नाही. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी चित्रपटाने २.५० कोटींचा गल्ला जमा केला होता. शनिवारी ४ कोटी तर रविवारी चित्रपटाने ४.२० कोटी रूपयांपर्यंत मजल मारली. म्हणजे चित्रपटाने तीन दिवसांत फक्त १०.२० कोटींची कमाई केली आहे.
तर अभिनेता ह्रतिक रोशन आणि टायगर श्रॉफ स्टारर चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीत सामाविष्ट झाला. चित्रपटाने २५० कोटींचा आकडा पार केला आहे. प्रियांकाचा 'द स्काय इज पिंक' हा 'वॉर' चित्रपटाला टक्कर देताना फेल ठरला आहे.
आता येत्या काळात 'द स्काय इज पिंक' किती रूपयांचा आकडा गाठेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या सिनेमात प्रियंकाबरोबरच झायरा वसीम, फरहान अख्तर आणि रोहित सराफ मुख्य भूमिकेत आहे.