मुंबई : चार मैत्रिणींच्या घट्ट मैत्रीचा सिनेमा वीरे दी वेडींगची कमाई दिवसेंदिवस वाढतच आहे. हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी सिनेमातील बोल्ड सिन्सवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. पण आता या सिनेमाची कमाई या प्रश्नांना थेट उत्तर देत आहे. मॉडर्न काळातील मुली आपल्या पद्धतीने आपले आयुष्य जगू शकतात, असा आशय असलेला हा सिनेमा आहे. सिनेमाने चौथ्या दिवशीच ४२ रुपयांची कमाई केली आहे. कमाईची आकडे फिल्म ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शने आपल्या ट्विटर अकाऊंट शेअर केले आहेत.


अबब! इतकी कमाई...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री करिना कपूर खान, शिखा तलसानिया, सोनम कपूर आणि स्वरा भास्कर स्टारर वीरे दी वेडींगने पहिल्या दिवशी १० कोटी, दुसऱ्या दिवशी १२ कोटी आणि त्यानंतर सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या विकेंडला तब्बल १३ कोटींचा गल्ला केला. आता मात्र या सिनेमाची एकूण कमाई ४२.५६ कोटी इतकी आहे.



टॉप ५ सिनेमांच्या यादीत दाखल


याशिवाय ताबडतोब ओपनिंग करणाऱ्या सिनेमांमध्ये वीरे दी वेडींग हा सिनेमा टॉप ५ सिनेमांच्या यादीत दाखल झाला आहे. याशिवाय इंडियन सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने ही ए सर्टिफिकेट देत सिनेमा पास केला आहे. हा सिनेमा १ जूनला प्रदर्शित झाला. लहानपणापासून मैत्री असणाऱ्या चार मैत्रिणींची ही गोष्ट आहे.