मुंबई : द कपिल शर्मा शो चांगलाच वादात सापडला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर नवज्योत सिंह सिद्धू यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर त्यांना कपिल शर्मा शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यानंतर आता कपिल शर्माला देखील शोमधून काढण्याची मागणी जोर धरु लागली आहे. कपिलचा हा शो बंद करण्याची मागणी होत आहे. सिद्धू यांना शोमधून काढल्यानंतर कपिल शर्माने त्यांना शोमधून काढायलं नको होतं अशी प्रतिक्रिया दिली होती. पण आता कपिल शर्माचं यामुळे अडचणीत सापडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपिलने सिद्धू यांना शोमधून काढून टाकल्यानंतर त्यावर नाराजी दर्शवली होती. ट्विटरवर कपिल आणि सोनी टीव्हीला बॉयकॉट करण्यासाठी #BoycottKapilSharma हॅशटॅग ट्रेंड होत आहे. कपिलने यावर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, लोकांची दिशाभूल करण्यासाठी अशा प्रकारचे हॅशटॅग चालवले जातात. बायकॉट सिद्धू किंवा बायकॉट कपिल शर्मा शो असं हॅशटॅग ट्रेंड होत आहे.


याआधी नवज्योत सिंह सिद्धू हे आपल्या दुसऱ्या कामात व्यस्त असल्याने आम्ही अर्चना पूरन सिंह सोबत शूटींग करत आहोत असं कपिलने म्हटलं होतं. जेव्हा कपिलला सिद्धू यांना शोमधून काढल्यानंतर यावर प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा कपिलने म्हटलं की, ही खूप छोटी गोष्ट आहे. हा प्रचाराचा देखील एक भाग असू शकतो. मला वाटतं की, कोणालाही बंदी घालणं किंवा नवज्योत सिंह सिद्धू यांना शोमधून काढणं हे समाधान नाही असू शकत. यामागची कारणं शोधण्याची गरज आहे.