मुंबई : सिनेसृष्टीत नाती तयार होतात आणि बिघडतात देखील. कॅमेऱ्याच्या या झगमगाटात कलाकारांच्या नात्यांना पाहण तसं कठीणच आहे. मात्र काही गोष्टी लपून राहत नाहीत. असंच काहीसं होतंय हॉलिवूडच्या अभिनेत्यासोबत. अभिनेता ब्रॅड पिट आणि अभिनेत्री जेनिफर एनिस्टन यांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा रंगतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एंजेलिना जोलीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर ब्रॅड पिट सिंगल असल्याची चर्चा रंगली. असं असताना त्याची एक्स पत्नी जेनिफर एनिस्टनचा घटस्फोट झाला. यानंतर दोघांची नाव पुन्हा एकदा चर्चेत आली. ब्रॅड आणि जेनिफर यांच्यात पुन्हा एकदा मैत्री झाली. आता असं म्हटलं जातंय की, दोघं पुन्हा एकदा एकमेकांच्या प्रेमात पडलेत. 



पुरस्कार सोहळा किंवा एकमेकांवर प्रतिक्रिया देण्यावरून तरी हे दोघं जवळ आल्याचं म्हटलं जातं आहे. नुकतेच हॉलिवूडच्या लोकप्रिय अवॉर्ड शो SAG म्हणजे Screen Actors Guild Awards चे आयोजन केले होते. यावेळी ब्रॅडला सिनेमाकरता आणि जेनिफरला तिच्या कार्यक्रमाला पुरस्कार देण्यात आला. 


ब्रॅड पिटच्या स्पीचच्यावेळी जेनिफर आनंदी दिसली तर जेनिफरच्या स्पीचच्या वेळी ब्रॅड अतिशय आनंदात दिसला. एकमेकांबद्दलचा राग विसरून हे दोघं पुन्हा जवळ येताना दिसत आहेत. पण आता अशी बातमी समोर येतेय की, या दोघांच्या मैत्रीमुळे एंजेलिना जोली खूप नाराज आहे. एंजेलिनाला ब्रॅड आणि जेनिफरची मैत्री अजिबातच आवडलेली दिसत नाही. ती दुसरीकडेच लक्ष देण्याचा प्रयत्न करत आहे. 


ब्रॅड पिट आणि जेनिफर एनिस्टनने 2000 मध्ये लग्न केलं होतं. 2005 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर ब्रॅडने मिस्टर आणि मिसेस स्मिथ या सिनेमातील को स्टार एंजेलिनासोबत 2014 मध्ये लग्न केलं. या दोघांची ओळख 2005 मध्ये झाली होती. अनेकवर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांनी लग्न केलं पण हे लग्न फक्त 2 वर्षच टिकू शकलं.