मुंबई : चित्रपटात एकत्र काम करत स्टार्स अनेक वेळा एकमेकांच्या प्रेमात पडतात. मात्र प्रेमात पडूनही काही कपल्स एकमेकांचे कधीच होवू शकत नाही. याच यादीमध्ये अभिनेत्री अमृता सिंह आणि विनोद खन्ना यांचा समावेश आहे. 80च्या दशकात विनोद खन्ना यांच्यावर अमृता मनापासून प्रेम करायची. पण काही कारणांमुळे या दोघांचं नातं फारकाळ टिकू शकलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वयाने 12 वर्षांनी मोठे असेलेले विनोद खन्ना आणि अमृता सिंह यांची चर्चा सर्वत्र होवू लागली. अमृताची त्यावेळी विनोद यांच्यासोबत लग्न करण्याची ईच्छा होती. आज आम्ही तुम्हाला सागंणार आहोत लग्नाचं स्वप्न बघत असलेली अमृता विनोद यांच्यापासून का दुरावली, या दोघांच्या ब्रेकअप मागचं नेमकं कारण काय?



अमृता सिंह- विनोद खन्ना अफेअर
असं म्हणतात की, जेव्हा अमृता आणि विनोद रिलेशनशिपमध्ये होते. तेव्हा या दोघांची लवस्टोरी जरा जास्तच चर्चेत होती. या दोघांची पहिली भेट सुपरहिट फिल्म बंटवाराच्या सेटवर झाली . मल्टी स्टारर या सिनेमाला जेपी दत्ता यांनी दिग्दर्शित केलं होतं. पण जेव्हा सेटवर अमृता विनोद यांना भेटली तेव्हा, ती त्यांची फॅन झाली. एका वृत्तानुसार, अमृताने विनोद यांना पहिल्यांच नजरेत पसंत केलं होत. मात्र विनोद यांनी अमृताला बिलकुल भाव दिला नाही. नंतर हळू हळू हे दोघंही एकमेकांचे चांगले मित्र झाले.


मीडिया रिपोर्टनुसार अमृता विनोदला भेटली तेव्हा ती माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांना डेट करत होती. दोघेही एकमेकांशी लग्न करणार होते. पण विनोद यांच्या प्रेमात तिने स्वत:ला कधी सरेन्डंर केलं हे स्वतः अमृतालाही कळालं नाही. असं म्हटलं जातं की, रवी अमृताला कायम चिडवायचे की, तुला विनोद कधीच भेटणार नाहीत ज्याच्यामुळे अमृताची चिडचिड व्हायची.


अमृताला ऐकाव्या लागल्या या गोष्टी 
एक काळ असा आला की, जेव्हा विनोद आणि अमृताच्या अफेअर्सच्या बातम्या त्या काळच्या सगळ्या वर्तमानपत्रांत येऊ लागल्या. एवढंच नव्हे तर लोक विनोदला अमृताचे वडीलही म्हणू लागले होते. पण या सगळ्या बातम्यांकडे दुर्लक्ष करत अमृताची विनोदबरोबर राहण्याची मनापासून इच्छा होती.


का झालं ब्रेकअप?
अमृता सिंग आणि विनोद यांचं नातं फार काळ टिकलं नाही. असं म्हणतात की, अमृताच्या आईला त्यांचे संबंध मान्य नव्हते. जेव्हा अमृताची आई रुकसाना सुलतानला अमृताच्या अफेअर्स संबंधाची माहिती मिळाली तेव्हा तिच्या मुलीने आपल्यापेक्षा 12 वर्षांपेक्षा मोठ्या वयाच्या माणसाशी लग्न करू नये अशी त्यांची इच्छा होती. या कारणामुळे अमृताने हे नातं ईथेच संपवलं.