मुंबई : ‘द बॉडी स्टीलर’, ‘द फाईल ऑन द गोल्डन गूस’, ‘सिटी ऑफ बॅनशी’ अशा एकापेक्षा एक चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री हिलेरी हीथने अखेरचा श्वास घेतला आहे.  त्या ७४ वर्षांच्या होत्या. त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती. ४ एप्रिल रोजी त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी फक्त सात दिवस कोरोना या धोकादायक विषाणूविरुद्ध संघर्ष केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 हिलेरी यांचा मुलगा अलेक्स विलियम्सनं याने एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांच्या मृत्यूची बातमी दिली. त्यांच्या अशा जाण्यामुळे कलाविश्वात शोक कळा पसरली आहे. 
त्या हॉलिवूड मधील अत्यंत नामवंत आणि प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांनी ‘विचफाइंडर जनरल’ या भयपटातून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती.



७०च्या दशकात त्यांना द क्वीन ऑफ हॉरर अर्थात भयपटांची राणी म्हणून संबोधले जात असे. हिलेरी यांच्या आगोदर देखील अनेक कलाकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हॉलिवूड बरोबरच बॉलिवूडला देखील कोरोनाची झळ लागली आहे. दिवस वाढत आहेत त्याचप्रमाणे कोरोना व्हायरसचा धोका देखील वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या ससंख्येत झपाट्याने  होत असलेली वाढ संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा ठरत आहे. 


संपूर्ण जगभरात आतापर्यंत १,६७६,२६५  हून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १०३,६६० लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील २०.८ टक्के रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. ३ लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.