मुंबई : फॅशन इंडस्ट्रीमधील टॉप मोस्ट मॉडेल ब्रूना अब्दुल्लाह आपल्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हल्लीच ब्रूनाने बिकिनीतील फोटोशूट केलं आहे. आणि मग हेच फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र हे फोटो शेअर करणे तिला पडले महागात. तिच्या या फोटोंना नेटीझन्सने टार्गेट केलं आहे. तिच्या या बिकिनी फोटो खाली तिला अक्षरशः शिव्या घालण्यात आल्या आहेत. 



ब्रूनाच्या या जबरदस्त हॉट फोटो शूटला बघून लोकं भडकले आहेत. या फोटोंवर तिला भरपूर शिव्या मिळाल्या आहे. नेटीझन्सने ब्रूनाला या फोटोखाली कमेंट करून कपडे घालण्याचे सल्ले दिले आहेत. ब्रूनाने अक्षय कुमारसोबत काम केलं आहे. त्यामुळे अक्षयची हिरोईन म्हणून तिला ओळखतात. 




ब्रूनानने आतापर्यंत ‘हेट लवस्टोरी’, ‘देसी बॉईज’ आणि ‘ग्रॅण्ड मस्ती’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु ती तिच्या चित्रपटांपेक्षा मॉडेलिंग क्षेत्रामुळे अधिक चर्चेत राहिली आहे. ती नियमितपणे तिचे हॉट सिजलिंग फोटोज् सोशल मीडियावर शेअर करीत असते. परंतु यावेळेस तिने शेअर केलेले फोटो लोकांना फारसे पसंत पडले नसावेत असेच दिसत आहे. परंतु लोकांच्या या कॉमेण्ट आणि संतापाचा ब्रूनावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नसताना दिसत आहे. ती लोकांच्या या कॉमेण्टकडे फारसे लक्ष न देता सातत्याने बिकिनी आणि न्यूड अवतारातील फोटोज् तिच्या सोशल अकाउंटवर शेअर करीत आहे.