कोण आहे `बंटी`ची नवीन `बबली`? महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांसोबत खास कनेक्शन
`बंटी`ची नवीन `बबली` करत आहे अनेकांना घायाळ, महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांसोबत खास कनेक्शन
मुंबई : 'बंटी आणि बबली 2' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या माध्यमातून नवीन बंटी आणि बबली प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. अभिनेत्री राणी मुखर्जी, अभिनेता सैफ अली खान आणि सिद्धांत चतुर्वेदी याआधी प्रेक्षकांच्या भेटीस आले. त्यानंतर आता नवीन बबली म्हणजेचं शर्वरी वाघ (Sharvari Wagh) चर्चेत आहे. शर्वरी वाघ 'बंटी और बबली 2' चित्रपटात बबलीची भूमिका बजावताना दिसणार आहे. शर्वरी सध्या अन्य अभिनेत्रींप्रमाणे प्रसिद्ध नाही. पण शर्वरी तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांनी अनेकांना घायाळ केलं आहे.
महत्त्वाचं म्हणजे शर्वरीचं महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्र्यांसोबत खास कनेक्शन आहे. पण त्यांच्या या नात्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. शर्वरी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे. त्यांचं हे नातं फार कमी लोकांना माहिती आहे. दरम्यान चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सर्वत्र फक्त तिच्याचं बोल्ड अदांची चर्चा आहे.
शर्वरी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. शरवरीने आता बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. 'यशराज फिल्म्स' अंतर्गत फिल्म 'बंटी और बबली 2' (Bunty Aur Babli 2) चित्रपट तयार होत आहे. त्यामुळे आता या चित्रपटाबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे.
शर्वरी यशराज फिल्म्सच्या टॅलेंट टीमची निवड आहे. शर्वरी वाघला 'बंटी और बबली 2' चित्रपटात संधी देण्यापूर्वी टीमने तिला दोन वर्षे खूप प्रशिक्षण दिले. शर्वरी याआधी 'द फॉरगॉटन आर्मी' या वेबसीरिजमध्ये दिसली होती. ज्यामध्ये तिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे खूप कौतुक झाले होते.