मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या अनेक मजूरांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. मोठ्या पडद्यावर अनेकदा खलनायकाची भूमिका साकारणारा सोनू सूद अनेकांसाठी हिरो ठरला आहे. सोनू सूदने लॉकडाऊनच्या काळात अनेक कामगार, मजूरांना आपल्या घरी पोहचण्यासाठी बस गाड्यांची सोय केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी सोनूने मुंबईत अडकलेल्या कर्नाटकातील प्रवासी मजूरांना घरी जाण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांची परवानगी घेत १० बस गाड्यांची सोय केली. त्याच्या याच कामाचं राज्याचे कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनीदेखील कौतुक केलं आहे. जयंत पाटील यांनी ट्विट करत, पडद्यावर खलनायकाचं काम करणारा, प्रत्यक्ष आयुष्यात हिरोचं काम करत असल्याचं म्हणत त्यांनी सोनूच्या कामाचं कौतुक केलं आहे.



कोरोना व्हायरच्या संकटात आधीदेखील सोनू सूदने मदत केली होती. कोरोना योद्धांना जुहू येतील हॉटेल राहण्यासाठी दिलं होतं. एवढंच नाही तर त्यांने लॉकडाऊनमध्ये गरीब-गरजूंच्या मदतीसाठी अन्न वाटपही केलं होतं. 


कोरोना फायटर्ससाठी आपलं जुहू हॉटेल दिल्यानंतर आता सोनू सूद करणार अन्नदान


कोरोनाचं संकट, लॉकडाऊनमुळे अनेक मजूरांचे हाल होत आहेत. हाताला काम नसल्याने मजूरांनी आपल्या गावची वाट धरली आहे. मिळेल त्या मार्गाने कधी सरळ पायीचं जाण्याचा मार्ग त्यांनी धरला आहे. या संकटाच्या काळात समाजातील याच घटकाप्रती आपली जबाबदारी ओळखत सोनू सूदने, स्वखर्चाने मजूरांना त्यांच्या राज्यात पाठवण्याचा निर्णय घेतला. संकटसमयी अतिशय स्तुत्य पाऊल उचलल्यामुळे सोशल मीडियापासून ते कलाविश्वापर्यंत हा रील खलनायक सर्वच जणांच्या प्रशंसेस पात्र ठरत आहे.