कोरोना फायटर्ससाठी आपलं जुहू हॉटेल दिल्यानंतर आता सोनू सूद करणार अन्नदान

लॉकडाऊन दरम्यान मदतीसाठी सोनू सूद आला पुढे

Updated: Apr 12, 2020, 02:46 PM IST
कोरोना फायटर्ससाठी आपलं जुहू हॉटेल दिल्यानंतर आता सोनू सूद करणार अन्नदान title=

मुंबई : कोविड -१९ च्या विरुद्ध लढ्यात सहकार्य करणाऱ्या योद्धांना जुहू येथील हॉटेल दिल्यानंतर अभिनेता सोनू सूदने आता लॉकडाऊनमध्ये गरजूंच्या मदतीसाठी अन्न वाटप करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. सोनू सूद यांचे दिवंगत वडील शक्ती सागर सूद यांच्या नावावर सुरू करण्यात आलेल्या शक्ती अन्नदानमच्या माध्यमातून मुंबईत दररोज सुमारे ४५ हजार लोकांना जेवणं पूरवण्याचा त्याचा संकल्प आहे. 

अभिनेता सोनू सूदने म्हटलं की, "आपण कोरोनोव्हायरसच्या विरूद्ध या कठीण काळात एकत्र आहोत. आपल्यातील काहीजणांना अन्न आणि निवारा मिळाल्याचा आनंद झाला आहे, परंतु असे बरेच लोक आहेत जे बरेच दिवसापासून जेवले नाहीत. हे खरोखरच कठीण आहे. या लोकांना मदत करण्यासाठी मी माझ्या वडिलांच्या नावावर विशेष अन्न आणि रेशन मोहीम सुरू केली आहे आणि जास्तीत जास्त लोकांना मी मदत करु शकेल अशी आशा आहे.

तो सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोना व्हायरसविषयी जागरूकता देखील करीत आहे आणि घरी कसरत कशी करावी आणि फिटनेस कसा ठेवावा हे देखील सांगत आहे.

पूर्वी सलमान खानचे निकटवर्तीय असलेले बाबा सिद्दीकी यांनी देखील पोस्टमध्ये हे दाखवून दिले होते की सलमान कशा प्रकारे ट्रकमध्ये भरुन कामगारांच्या घरी राशन पाठवत आहे. सलमान स्वत: आपल्या कुटुंबापासून दूर फार्महाऊसवर अडकला आहे.