फोटोत दिसणाऱ्या दोन लहान मुलींचं बॉलीवूडशी कनेक्शन, एकीचे निधन तर दुसरी...
Dimple Kapadia Childhood Photo: सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतो आहे ज्यात तुम्हाला त्या फोटोतून दोन बहीणी दिसतील. या दोन्ही बहीणींनी बॉलिवूडमध्ये मोठ्या सुपरस्टार्ससोबत डेब्यू केला होता.
Dimple Kapadia Childhood Photo: बॉलिवूडच्या नायिकांचे लहानपणीचे फोटो पाहिल्यावर प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न पडायला लागतात. या नक्की कोण? ही ती तर नाही ना? त्यातून ही त्याची तर बायको नाही ना सोबतच ह्याच्यासोबत तर त्याचे ब्रेकअप झालेले नाही ना... त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते. अशातच आता चर्चा आहे ती म्हणजे अशाच काही अभिनेत्रींची. या अभिनेत्री दोन बहीणी आहेत. त्यातील एकीच्या अकाली मृत्यूमुळे दुसरीच्या आयुष्यात खूप मोठं वादळं आलं होतं. त्यामुळे त्यातूनही ती बाहेर आली आणि मग तिनंही आपलं करिअर हे खुलवलं. त्यामुळे तिचीही जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. आताही तिची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. सध्या ही अभिनेत्री फार मोठी आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्यामुळे तिची फार चर्चा रंगलेली असते. या अभिनेत्रीनं लोकप्रिय अभिनेत्याशी लग्न केले होते. तिची मुलगी आणि जवाईही या क्षेत्रातच आहेत.
एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल की आम्ही कोणत्या अभिनेत्रीबद्दल बोलतो आहोत. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे ज्येष्ठ अभिनेत्री डिंपल कपाडिया. डिंपल कपाडिया ही आजही फारच लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्यामुळे तिची जोरात चर्चा ही रंगलेली असते. डिंपल कपाडिया यांचा फॅन बेसही खूप मोठा आहे. 70-80 च्या दशकात डिंपल कपाडिया या फारच लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा रंगेलली असायची. ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्यासोबत त्यांचे अनेक सिनेमे गाजले होते. त्यांचा 'सागर' हा चित्रपटही प्रचंड गाजला होता. त्यामुळे या चित्रपटाची जोरात चर्चा रंगलेली होती. या चित्रपटातील गाणीही विशेष गाजली होती.
हेही वाचा : जिनं राखी बांधली तिच्याशीच लग्न; अमिताभ बच्चन यांच्या ऑनस्क्रिन मुलाचाही आज वाढदिवस, ओळखलं?
डिंपल कपाडिया यांनी आता ओटीटी माध्यमांवरूनही अनेक सिरिज आणि चित्रपट केले आहेत. त्यांची 'सासू, बहू और फ्लेमिंगो' ही सिरीजही प्रचंड गाजली होती. त्यानंतर त्यांनी 'द थर्स्डे' या चित्रपटातूनही चांगली कमाई केली होती. त्यामुळे याचीही प्रचंड चर्चा रंगलेली होती. त्यांनी 'दिल चाहता हैं', 'तू झुठी मैं मक्कार' हे चित्रपटही प्रचंड गाजले.
नक्की काय घडलं होतं?
डिंपल कपाडिया यांच्या सख्ख्या बहीणीचं नावं होतं सिंपल कपाडिया. सिंपल कपाडिया हीच मात्र फारच लवकर निधन झालं. तिनं आपल्या पहिल्याच चित्रपटातून डेब्यू केला होता तोही राजेश खन्नासोबत. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आल्यानंतर फॅशन डिझायनिंगचंही करिअर त्यांनी निवडलं होतं. त्यांनी फार कमी चित्रपटांमध्ये कामं केली होती. 10 नोव्हेंबर 2009 ला त्यांचे निधन झाले.