मुंबई: अभिनेत्री सोनाली ब्रेंद्रे हिने काही महिन्यांपूर्वी तिला कॅन्सर झाल्याचं जाहीर केलं. ज्यानंतर अनेकांनाच धक्का बसला. सोनालीला झालेल्या या आजाराचं वृत्तं कळताच चाहत्यांमध्येही चिंतेची लाट पसरल्याचं पाहायला मिळालं.  मुख्य म्हणजे इतकं मोठं आजरपण येऊनही सोनाली मात्र प्रत्येक प्रसंगाचा मोठ्या खंबीरपणे सामना करताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडिया पोस्ट म्हणू नका किंवा मग नव लूक, सोनालीने प्रत्येकवेळी अनेकांनाच थक्क करुन सोडलं.


अशी ही अबिनेत्री सध्याही अशाच एका व्हिडिओमुळे प्रकाशझोतात आली आहे. 


'इंडियाज बेस्ट ड्रामेबाज' या रिअॅलिटी शोच्या स्पर्धकांसाठी सोनालीने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पाहता, तिने दिलेला संदेश खऱ्या अर्थाने इतरांनाही प्रेरणा देत आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 


हाय ग्रेड कॅन्सरशी लढा देणारी सोनाली या व्हिडिओमध्ये, हरणं आणि जिंकण्यामधलं गणित समजावून सांगताना दिसत आहे. 


जिंकणं आणि हरणं हे महत्त्वाचं नसून एखाद्या गोष्टीचं आव्हान पेलणंच महत्त्वाचं असतं आणि ही एक प्रकारची शिकवणच आहे, असं ती या व्हिडिओत म्हणताना दिसत आहे. 



स्पर्धकांना शुभेच्छा देणारी सोनाली आणि तिच्या चेहऱ्यावरीलस उत्साह पाहण्याजोगा आहे. 


गेल्या काही दिवसांपासून ती आजारावर उपचार घेण्यासाठी म्हणून परदेशात गेली असून, तिच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचं कुटुंबियांकडून आणि मित्रपरिवाराकडून कळत आहे. प्रेक्षकांच्या सदिच्छाही तिच्यासोबत आहेतच.