मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आपल्या लग्नानंतर एक दिवस सासरी राहिली. आणि लगेचच कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी इंटरनॅशनल स्टेजवर पोहोचली. पहिल्यांदाच आपल्या बहिणीशिवाय सोनम कपूर कान्स फिल्म फेस्टिवलला गेली. बहुदा सोनम कपूरही पहिली अशी अभिनेत्री आहे जी लेहंगा परिधान करून कान्समध्ये दिसली. या लूकसोबतच सोनम कपूर आणखी एका गोष्टीमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली. या फोटोत सोनम कपूरने पाकिस्तानी अभिनेत्री महिरा खान हिला चक्क KISS करताना दिसली. 


यासाठी सोनम कपूरने केलं KISS 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनम कपूर आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान या दोघेही कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये कॉस्मेटिक ब्रांड लोरियाल पेरिसचा प्रतिनिधित्व करत आहेत. सोमवारी या दोघेही अभिनेत्री रेड कारपेटवर पुढे मागे येत असताना दिसल्या. सोनम कपूर इथे सुंदर अशा सफेद रंगाच्या लेहंगामध्ये दिसली. या लेहंग्याला डिझाइनर राल्फ एंड रूसोने डिझाइन केलं आहे. माहिरा खान ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसली. या इव्हेंटचा आणखी एक फोटो सध्या व्हायरल होऊन चर्चेत आला आहे. आणि तो फोटो म्हणजे सोनम कपूरने माहिरा खानला KISS केलं आहे. 



सोनम कपूरला काही दिवसांपूर्वीच माहिरा खानने सोशल मीडियावर लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यावेळी माहिराने धन्यवाद देताना सोनम कपूरने तिला सांगितलं होतं की, कान्समध्ये वेळ घालवण्यात ती खूप आतुर आहे. माहिरा खान शाहरूख खानसोबत रईस या सिनेमांत पाहायला मिळाली.