लोकांसाठी अवघ्या 1 रुपयात हवाई प्रवास… ही सत्य कहाणी खूप रंजक आहे
तुम्ही विमानाने फक्त एका रुपयात प्रवास केल्याचे 16 वर्षांपूर्वी जेव्हा ऐकले असते, तर त्यावर तुम्हाला विश्वास ठेवणे कठीण झाले असते.
मुंबई : तुम्ही विमानाने फक्त एका रुपयात प्रवास केल्याचे 16 वर्षांपूर्वी जेव्हा ऐकले असते, तर त्यावर तुम्हाला विश्वास ठेवणे कठीण झाले असते. आजही हवाई प्रवास खूप स्वस्त झाला आहे. परंतु कदाचित दीड दशकापूर्वी सर्वसामान्यांसाठी हे स्वप्नासारखेच होते. एक रुपयात विमान दौरा, ही स्कीम कॅप्टन जीआर गोपीनाथ यांनी सुरू केली. सध्या त्याची बरीच चर्चा सुरु आहे. कारण त्याची स्टोरी ऑनलाईन स्ट्रीमींग प्लॅटफॉर्मवरील 'उडान' या चित्रपटात दाखविली जात आहे.
सैन्य अधिकारी बनले व्यापारी
सेवानिवृत्त झालेले भारतीय लष्कराचे अधिकारी जी.आर.गोपीनाथ यांचे प्रयत्नामुळे विमानातून प्रवासा करणे या स्वप्नाचे रूपांतर सत्यात झाले आहेत. जी.आर.गोपीनाथ हे 'एअर डेक्कन' या देशातील पहिल्या बजेट एअरलाईन्सचे संस्थापक आहेत. ही एअरलाईन्स केवळ दोन वर्षेच चालू होती.
कॅप्टन गोपीनाथ यांनी इझीजेट आणि रायन एअर सारख्या युरोपियन बजेट कॅरियरच्या धर्तीवर या स्कीमला बाजारात आणले होते केली. 16 वर्षांपूर्वी कॅप्टन गोपीनाथ यांनी प्रतिस्पर्धी एअरलाईन्स कंपन्यांच्या तुलनेत निम्म्या दराने लोकांना तिकिटे विकली होती.
स्वप्नांना पंख
कॅप्टन गोपीनाथ यांनी डायनॅमिक किंमतीची संकल्पना भारतीय एअरलाईन्स कंपन्यांना दिली. याद्वारे, प्रथम येणाऱ्या प्रवाशांना, प्रथम सेवा देण्याच्या आधारावर एक रुपयात प्रवास करण्याची संधी उपलब्ध करून दिली. उशीरा किंवा शेवटच्या क्षणी ज्यांनी तिकीट बूक केले त्यांना जास्त तिकीटाचे दर द्यावे लागले असे प्लॅन काढले. उर्वरित एअरलाईन्सच्या तुलनेत ही किंमत खूप कमी होती. या योजनेनंतर ग्राहक बुकिंग काऊंटरवर गर्दी करु लागले.
प्रत्येक भारतीयांना दिला फ्लाइंगचा अनुभव
अॅमेझॉन प्राईमवर रीलीज झालेल्या 'उडान' चित्रपटाची निर्मिती अकादमी पुरस्कार विजेता गुनीत मोंगा यांनी केली आहे. त्यात तमिळ स्टार सूर्याने गोपीनाथची भूमिका साकारली आहे.
चित्रपटाचे निर्माते गुनीत मोंगाच्या म्हणण्यानुसार गोपीनाथ यांनी भारतीयांना कमी किंमतीत एअरलाईन्समधून प्रवास करण्याची संधी दिली. चित्रपटात दाखविण्यात आले आहे की, कसे कॅप्टन गोपीनाथ यांनी कित्येक वर्षे निष्क्रिय पडून असणाऱ्या देशातील 500 विमानतळ आणि हवाई पट्ट्यांचा वापर करुन प्रत्येकाला एकमेकांशी जोडण्याचा प्रयत्न केला.