मुंबई : अभिनेता रणवीर सिंगने केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. न्यूड फोटोशूट केल्यामुळे रणवीरच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. न्यूड फोटोशूट करणं रणवीरला चांगलंच महागात पडलं आहे. एका स्वयंसेवी संस्थेनं अभिनेत्यावर चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. असे न्यूड फोटोशूट करून रणवीरने भारतीय संस्कृतीचं उल्लंघन केलं असून त्यानं महिलांच्या भावना दुखावल्या आहेत. यामुळे रणवीर सिंगवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणवीर सिंगने दोन दिवसांपुर्वी पेपर मॅगझीनसाठी न्यूड फोटोशूट केलं आहे. त्यानंतर रणवीरच्या या फोटोशूटवर अनेकांनी चीड व्यक्त केली. अनेकांना त्याने केलेलं हे फोटोशूट पसंत पडलं नव्हतं आणि आता त्याच्यावर कलम 67 A, 292, 293, 354 आणि 509 यांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 ज्या स्वयंसेवी संघटनेनं हा गुन्हा दाखल केला आहे, त्यांनी रणवीरवर भारतीय संस्कृतीचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. भारत संस्कृतीचं जतन करणारा देश आहे. या देशात अभिवक्ती स्वातंत्र्य आहे.  


बॉलीवूडमध्ये अभिनेत्याला नायक संबोधले जाते आणि सोशल मीडियावर अशा नायकांना फोलो करणारे असंख्य लोकं असतात तेव्हा अशाप्रकारे रणवीरने असे न्यूड फोटोशूट करू नये असं देखील संस्थेनं म्हटलं आहे. 


दरम्यान, रणवीरनंतर अनेक सेलिब्रिटींचे न्यूड फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रणवीरच्या फोटोशूटनंतर सोशल मीडियावर न्यूड फोटोशूटचं ट्रेंड सुरू आहे, असं म्हणायला हरकत नाही.