Casting Couch With Amey and Nipun च्या नव्या एपिसोडमध्ये राधिका आपटे
राधिका आपटेच्या चाहत्यांची संख्या आपल्याला माहित आहे.
मुंबई : राधिका आपटेच्या चाहत्यांची संख्या आपल्याला माहित आहे.
तिला भेटण्याची संधी मिळाल्यावर चाहते नेमकं काय करतील आणि काय नाही याचा अंदाजही तुम्हाला लावता येणार नाही. असाच एक प्रकार एका कार्यक्रमात घडला आहे.
राधिका आपटेला पाहताच तिचा एक चाहता अगदी वेडापिसा झाला. त्याने चक्क तिला पाहताच फुलांचा वर्षाव केला. अशी अवस्था कुणाची नाही होणार राधिका आपटे समोर असेल तर कुणालाही काय करू आणि काय नको असंच होईल. सध्या हा व्हिडिओ चर्चेत आहे. आणि त्याला कारण देखील तसंच आहे. राधिका आपटे Casting Couch with Amey and Nipun च्या तिसऱ्या सिझनमध्ये आपल्याला पाहायला मिळाली.
मराठीत वेब सिरीजसुरू करण्याचा पहिला ट्रेंड अमेय आणि निपुणने रुजू केला. कास्टिंग काऊचमध्ये आतापर्यंत अनेक सेलिब्रिटी आले आहेत. यामध्ये बॉलिवूड स्टारचा देखील समावेश होता. या दोघांची ही सिरीज प्रेक्षकांच्या अधिक पसंतीला पडली. आता या वेबसिरीजचा तिसरा सिझन आहे. या सिझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये राधिका आपटे आली आहे.
राधिका आपटेसाठी 2018 हे वर्ष खास असणार आहे. पॅडमॅनने या वर्षाची सुरूवात झाली आहे. या वर्षात तिचे तीन सिनेमे येणार आहेत. खिलाडी अक्षय कुमार, साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत राधिका दिसणार आहे.