Sonali Phogat Case : भाजप नेत्या आणि सोशल मीडिया स्टार सोनाली फोगट यांच्या (sonali phogat) मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सीबीआयने या प्रकरणी 500 पानांची चार्जशीट दाखल केली आहे. चार्जशीटमध्ये सोनाली यांचे सहकारी सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांचा आरोपी ठरवण्यात आलं आहे. शिवाय सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांनी सोनालीच्या हत्येचा कट रचल्याचं देखील चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आलं आहे. सोनाली यांच्या हत्येमागे दोघे मुख्य सूत्रधार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. (sonali phogat death)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपत्तीसाठी सुधीरने सोनालीच्या हत्येचा कट रचून हत्या केल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं आहे. पण सीबीआयने सोनाली फोगट यांच्या हत्येचं कोणतंही कारण सांगितलेलं नाही. 23 ऑगस्ट 2022 रोजी गोव्यामध्ये सोनाली यांची हत्या करण्यात आली. (sonali phogat bjp)


वाचा : Sushant Singh Rajput ची मॅनेजर दिशा सालियनचा मृत्यूचं कारण अखेर समोर


सोनालीच्या हत्येच्या एका दिवसापूर्वीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली. व्हिडीओमध्ये सोनाली लडखडत चालत असल्याचं दिसून आलं. एक व्यक्ती त्यांना रुमच्या दिशेने घेऊन जाताना दिसत होता. त्यानंतर गोवा पोलिसांनी या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सोनाली फोगटला जबरदस्तीने ड्रग्ज देण्यात आल्याचं स्पष्ट केलं. ( death of sonali phogat )


व्हिडीओ समोर आल्यानंतर सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांनी पोलिसांसमोर कबुली दिली. आता सोनाली फोगट हत्या प्रकरण पुढे कोणतं वळण घेईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


सोनाली फोगट हत्या प्रकरण सीबीआयच्या हाती लागल्यानंतर, पुरावे आणि कागदपत्रांची बारकाईने तपासणी करण्यात आली. तपासणीच्या आधारावर 500 पानांची चार्जशीट दाखल करण्यात आली. सीबीआयने आरोपपत्रात काय लिहिले आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (sonali phogat family)


सोनाली फोगाट यांचं अलिशान घर आणि गाड्या


सोनाली फोगाट हिसारमधल्या संत नगर इथं रहात होत्या. इथं त्यांचं अलिशान घर आहे. घराव्यतिरिक्त सोनाली यांच्या नावावर हिसारमधल्या गंगवा गावात 117 एकर जमीन आहे. तर त्यांच्याकडे ब्लॅक कलरची XUV कार आहे. (sonali phogat income)


सोनाली फोगाट यांची कमाई
सोनाली फोगाट एका फिल्मसाठी 20 ते 25 लाख रुपये मानधन घेत होत्या. तर बिगबॉसमधून त्यांनी प्रत्येक एपिसोडसाठी 80 हजार रुपये घेतल्याची माहिती आहे. सोनाली फोगाट कोट्यवधी रुपयांची मालकीन होती. सोनाली फोगटकडे 25 लाख 61 हजार रुपयांची स्थावर तर  2 कोटी 48 लाख 50 हजार रुपयांची जंगम मालमत्ता सोडली आहे.