मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी सीबीआयने खुलासा केला आहे. तपासाबाबत मीडियात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा सीबीआयकडून इन्कार करण्यात आला आहे. कुणीही अधिकारी मीडियाशी बोलला नसल्याचे सीबीआयकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी सीबीआयच्या हवाल्यानं मीडियात प्रसिद्ध झालेल्या बातम्या कपोलकल्पित आणि वस्तुस्थितीवर आधारित नाहीत, असा खुलासा सीबीआयने केला आहे. सुशांतसिंहची हत्या झाल्याचे पुरावे सीबीआय तपासात आढळले नाहीत. त्यामुळे आता आत्महत्येच्या अँगलने तपास सुरू आहे, अशा बातम्या सीबीआय सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र सीबीआयने खास पत्रक काढून याचा इन्कार केला आहे.


अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूबद्दल गेल्या महिन्यात चौकशीची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या पहिल्या अधिकृत निवेदनात केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) गुरुवारी म्हटले आहे की, सुशांत प्रकरणी चौकशीसंदर्भात विविध माध्यमांत प्रसिद्ध होणारी माहिती विश्वासार्ह नाही तसेच तथ्यावर आधारित नाही. परंतु हा एक प्रकारे 'सट्टा'चा प्रकार आहे. सुशांतप्रकरणी योग्य पद्धतीने चौकशी सुरु आहे. 


सीबीआयचे प्रवक्ते आर. के गौर यांनी सांगितले की, सीबीआयच्या तपासाला जबाबदार असणारे काही मीडिया रिपोर्ट सट्टेबाजीचे आहेत आणि तथ्यांवर आधारित नाहीत. एक धोरणाचा विषय म्हणून सीबीआय सध्या चालू असलेल्या तपासाचा तपशील शेअर करत नाही. सीबीआयचे प्रवक्ते किंवा कोणत्याही टीम सदस्याने चौकशीचा कोणताही तपशील माध्यमांशी शेअर केलेला नाही. सीबीआयचा हवाला देवून नोंदविण्यात आलेले  तपशील विश्वासार्ह नाहीत, असे ते म्हणाले.


 गेल्या एका आठवड्यात  सीबीआयने सुशांतसिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती, तिच्या कुटुंबातील सदस्य तसेच दिवंगत अभिनेत्याचे मित्र, कर्मचारी इत्यादींसह अनेक व्यक्तींची चौकशी केली आहे. सुशांतसिंहने १४ जून रोजी आत्महत्या केली होती. ज्या अपार्टमेंटमध्ये सुशांत मृतावस्थेत सापडलेल्या परिस्थितीचा शोध घेण्यासाठी सीबीआयचे १०  सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) सध्या मुंबईत तपास करत आहे.


दरम्यान, माझा सुशांतसिंह प्रकरणाशी काहीच संबंध नाही, असा दावा कपिल झवेरीने केला आहे. अभिनेता सुशांतसिह राजपूत प्रकरणाचा तपास करत असताना अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या व्हाट्सएप चॅटमध्ये गोव्याचे हॉटेल व्यावसायिक गौरव आर्या याचा उल्लेख आला. त्यानंतर ईडीने गौरव आर्या याला समन्स बजावले. याच वेळी गौरव आर्यासोबत कपिल झवेरीचे नावही चर्चेत आले होते.