सोनू सूद ते सुनील शेट्टी... जाणून घ्या किती शिकले आहेत हे बॉलिवूड स्टार
हे कलाकार अभ्यासात तितकेच यशस्वी आहेत.जेवढे ते सिनेसृष्टीत आहेत.
मुंबई : असं मानलं जातं की, त्यांच्या फिल्मी कारकिर्दीमुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार त्यांच्या अभ्यासाला पाहिजे तितकं महत्त्व देत नाहीत. परंतु अभिनेता सुनील शेट्टी, अभिषेक बच्चन, शाहिद कपूर आणि सोनू सूद हे अभ्यासात तितकेच यशस्वी आहेत.जेवढे ते सिनेसृष्टीत आहेत.
सुनील शेट्टी
11 ऑगस्ट 1961 रोजी जन्मलेल्या सुनील शेट्टीचे नाव हिंदी चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्यांमध्ये घेतलं जातं. बलवान या चित्रपटापासून त्यांचा चित्रपट प्रवास सुरू झाला आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देऊन तो इंडस्ट्रीचा सुपरस्टार बनला. सुनील शेट्टी केवळ अभिनयातच पुढे नाही तर अभ्यासातही अव्वल आहे. सुनीलने मुंबईच्या एचआर कॉलेजमधून हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे.
अभिषेक बच्चन
अभिषेक बच्चनने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात रिफ्युजी या चित्रपटातून केली होती. वडील अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणे अभिषेक चित्रपटसृष्टीत फारसा यशस्वी ठरला नाही. मात्र अभ्यासाच्या बाबतीत अभिषेक कुणाच्याही मागे नाही. त्याचम शालेय शिक्षण अनेक शाळांमधून झालं आणि उच्च शिक्षणासाठी तो प्रथम स्वित्झर्लंडमधील एगलॉन कॉलेजमध्ये गेला. त्यानंतर त्याने बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये आर्ट्सचं शिक्षण घेण्यास सुरुवात केली. परंतु तेथे तो आपलं शिक्षण पूर्ण करू शकला नाही आणि तो मुंबईला परतला.
शाहिद कपूर
शाहिदने 2003 मध्ये इश्क विश्क या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आणि लवकरच तो एक यशस्वी बॉलिवूड अभिनेता बनला. शाहिदने उडता पंजाब, हैदर आणि जब वी मेट यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची क्षमता सिद्ध केली आहे. शाहिदने चौथीपर्यंतचे शिक्षण दिल्लीत घेतलं आणि त्यानंतर पुढील शिक्षणासाठी मुंबईला गेला. त्याने मुंबईच्या मिठीबाई महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
सोनू सूद
आपल्या उत्कृष्ट व्यक्तिमत्वासाठी आणि चॅरिटीसाठी ओळखला जाणारा अभिनेता सोनू सूद याने 2002 मध्ये शहीद आझम या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सोनूने आपलं शालेय शिक्षण पंजाबमधील मोगा येथून केलं. याशिवाय त्याने नागपूरच्या यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं. इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंगमध्ये पदवी प्राप्त केली.