मुंबई : मुलाखतीत भाऊ कदमला त्याचा 50 पैशांच्या किस्स्यां बद्दल विचारले असता, त्याने त्याच्या गंमतीशीर आठवणी शेअर केल्या आहेत. भाऊ म्हणाला, "त्या काळात जास्त लोकांकडे टीव्ही नसायचा त्यामुळे ज्यांच्याकडे टीव्ही आहे, अशा लोकांकडे मी जाऊन बसायचो आणि त्यांना 50 पैसे भाडं म्हणून द्यायचो." आपली जागा जाऊ नये म्हाणून मग खुप लवकर तो तेथे जाऊन बसायचा आणि जो पर्यंतर ते लोकं त्याला घरातून हकलंत नाहीत तो पर्यंतर तो तिथेच बसायचा. त्याच बरोबर भाऊने अजून एक किस्सा शेअर केला, ज्यामध्ये तो 50 पैशात सायकल ही भाड्याने चालवायला घ्यायचा आणि वेळेचं भान ठेऊन त्याला ती सायकल चालवायला लागायची, असे ही त्याने सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


चला हवा येऊ द्या या झी मराठीवरील मालिकेने अवघ्या मराठी माणसांची मनं जिंकली आहेत, त्यांना मनापासून हसायला लावलं आहे. असं म्हणूया की हसवून हसवून त्यांनी अनेकांचे चांगले चांगले आजार पळवून लावले असतील. अशा माणसांनी ज्यांना महाराष्ट्राला भरभरुन हसवलं, डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसवलं अशा सर्व कलाकारांशी बातचित केली आहे, झी २४ तासचे संपादक निलेश खरे यांनी. कलाकारांनी त्यांच्या आयुष्यातील काही भन्नाट किस्से सांगितले आहेत.