नीलेश या `भाऊ`मध्येच तुला प्रत्येक हिरो कसा दिसतो? - कुशल बद्रिके
`चला हवा येऊ द्या` हा झी मराठीचा कार्यक्रम एवढा अप्रतिम आणि प्रेक्षकांना पोटभरून हसवणारा आणि ताण तणावापासून दूर ठेवणारा
मुंबई : 'चला हवा येऊ द्या' हा झी मराठीचा कार्यक्रम एवढा अप्रतिम आणि प्रेक्षकांना पोटभरून हसवणारा आणि ताण तणावापासून दूर ठेवणारा आहे की, या कार्यक्रमात पुढचा भाग काय असेल, त्याची छोटीशी झलक जरी पाहायला मिळाली, तरी प्रेक्षक ताणतणाव मुक्त होतात. चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम ताणतणाव मुक्तीची टॅबलेट झाला आहे.
'चला हवा येऊ द्या'चे सर्वच हिरो
'चला हवा येऊ द्या'च्या एका स्कीटमध्ये कुशल बद्रिकेने नीलेश साबळेंकडे पाहत प्रश्न विचारला. या भाऊ कदममध्येच तुला प्रत्येक हिरो कसा दिसतो? अर्थातच हा मजेदार प्रश्न डॉ. नीलेश साबळे यांनी एक स्माईल देऊन परतवून लावला.
किती आले आणि किती गेले
'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाचं आणखी एक विशेष म्हणजे, हिंदी चॅनेल्सवर चालणारे अनेक कॉमेडी शो या चला हवा येऊ द्या आधी आणि नंतर आले तरी ते बंद झाले.
काळानुसार बदलणारी कॉमेडी
पण 'चला हवा येऊ द्या', या कार्यक्रमात काळानुसार सतत होत असलेल्या बदलमामुळे हा कार्यक्रम नेहमीच प्रेक्षकांना भावतोय.
जबरदस्त स्टारकास्ट आणि टीम लीड
यात सर्वात महत्त्वाचं वाटतं ते चला हवा येऊ द्या कार्यक्रमाची स्टार कास्ट आणि टीम लीड. डॉ.नीलेश साबळे यांनी आपल्या स्टार कास्टची अशी काही मोट बांधली आहे की, प्रत्येक पंच प्रेक्षकांना आपल्या आजूबाजूला कोण बसलं आहे, आपण कुठे बसलो आहोत, हे विसरून हसायला भाग पाडते.
सतत नवीन प्रेक्षकांची भर
यात अनेक प्रेक्षक 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाला असे आहेत, जे कॉमेडीला नाकं मुरडतात किंवा त्यांच्या चेहऱ्यावरचे रंग कसाही जोक केला तरी बदलत नव्हते, पण चला हवा येऊ द्या, प्रत्येक प्रेक्षकाच्या चेहऱ्यावर हास्याची लाली आणणारा शो आहे.