मुंबई : OTT प्लॅटफोर्मला time limit नाही, तर तुम्ही OTT वर काही वेगळे करण्याचा प्रयत्न करता का? तुमचे काय मत आहे असा प्रश्न भाऊ कदमला विचारले असता, "मी डिजीटलसाठी काम केले नाही." असे त्याने सांगितले. परंतू त्याला मध्येच थांबवत श्रेया आणि कुशलने भाऊला OTT प्लॅटफोर्मवर केलेल्या 'लिफ्ट मॅन'या वेबसीरीज ची आठवण करुन दिली आणि श्रेया पुढे म्हणाली की, त्याने इतके काम केले आहे की, त्याला ते नक्की आठवत सुद्धा नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढे भाऊ कदम विषयी कुशल म्हणाला की, "भाऊचा एक मोठा सिनेमा येणार आहे. ज्यामध्ये तो मुख्य हिरोच्या भूमिकेत दिसेल." यावरुन तुमच्या लक्षात येईलच की, या वयातही भाऊकडे चांगले काम आहे.


पुढे डिजीटलवर आपली प्रतिक्रिया देताना भाऊ म्हणाला की, "डिजीटल प्लॅटफॅार्मवर काही नवीन प्रयोग करण्याची संधी मिळू शकते कारण, डिजीटल प्लॅटफॅार्मवर हिंन्दी किंवा अन्य भाषीय लोक असतात. ते लोकं मराठी कलाकारांना ओळखत नाहीत, ज्यामुळे काही वेगळ्या भूमिका करण्याची संधी मिळते आणि लोकं ते स्वीकारतात. मराठीत प्रेक्षक फक्त मला एक विनोदी कलाकार म्हणूनच ओळखतात ज्यामुळे दुसऱ्या भूमिका साकारणे शक्य होत नाही.



चला हवा येऊ द्या या झी मराठीवरील मालिकेने अवघ्या मराठी माणसांची मनं जिंकली आहेत, त्यांना मनापासून हसायला लावलं आहे. असं म्हणूया की हसवून हसवून त्यांनी अनेकांचे चांगले चांगले आजार पळवून लावले असतील. अशा माणसांनी ज्यांना महाराष्ट्राला भरभरुन हसवलं, डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसवलं अशा सर्व कलाकारांशी बातचित केली आहे, झी २४ तासचे संपादक निलेश खरे यांनी. कलाकारांनी त्यांच्या आयुष्यातील काही भन्नाट किस्से सांगितले आहेत.